गाताच्या वाडीत रस्सी कारखान्यातील कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या
By काशिनाथ वाघमारे | Updated: April 9, 2024 17:09 IST2024-04-09T17:08:35+5:302024-04-09T17:09:34+5:30
किरण मधुकर नवले (वय २८, रा. सुभाषनगर, बार्शी) असे आत्महत्या केलेल्या तरुण कामगाराचे नाव आहे. याबाबत चंद्रकांत बाळासाहेब शेळके (वय ४३, रा. बेलगाव) यांनी बार्शी तालुका पोलीसात खबर दिली आहे.

गाताच्या वाडीत रस्सी कारखान्यातील कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या
सोलापूर : नायलॉन रस्सी कारखान्यातील तरुण कामगाराने कारखान्यांमधील मटेरियल गोडावूनच्या छताच्या नायलॉन दोरीने ँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार, ९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी आठ वाजेपूर्वी गाताची वाडी येथे घडली. ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी गळफास घेतल्याने सुभाष नगर परिसरावर शोककळा पसरली आहे.
किरण मधुकर नवले (वय २८, रा. सुभाषनगर, बार्शी) असे आत्महत्या केलेल्या तरुण कामगाराचे नाव आहे. याबाबत चंद्रकांत बाळासाहेब शेळके (वय ४३, रा. बेलगाव) यांनी बार्शी तालुका पोलीसात खबर दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किरण नवले हा गेल्या पाच वर्षापासून मधुसूदन चांडक यांचे गाताचीवाडी (ता.बार्शी) येथील नायलॉन रस्सी कारखान्यात ऑपरेटर म्हणून काम करत होता. सध्या त्याचे काम रात्री आठ ते सकाळी आठ यावेळेत असते. सोमवार, ८ एप्रिल रोजी रात्री आठ वाजता कारखान्यात कामावर आला. मंगळवारी आठ वाजता काम संपवून कारखान्याबाहेर आला नाही. त्यामुळे कारखान्यात कामाच्या ठिकाणाबरोबर अन्य ठिकाणी त्याचा शोध घेत असता गोडावूनमध्ये छताच्या अॅगल ला किरणने नायलॉन दोरीने गळफास घेऊन लटकलेला दिसून आला.
याबाबत बार्शी तालुका पोलिसात अकस्मात मयत म्हणून नोंद करण्यात आली असून त्याच्या आत्महत्येमागील कारणाचा पोलिस तपास करीत आहेत. तपास हवालदार राजेंद्र मंगरुळे हे करत आहेत.