घरासमोरील झाडाला गळफास घेत रिक्षाचालकाची आत्महत्या
By रूपेश हेळवे | Updated: August 13, 2023 14:12 IST2023-08-13T14:10:32+5:302023-08-13T14:12:13+5:30
मल्लप्पा सिध्दाराम पांढरे ( वय ३१, रा. हुच्चेश्वर नगर भाग २) असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.

घरासमोरील झाडाला गळफास घेत रिक्षाचालकाची आत्महत्या
सोलापूर : तरूण रिक्षाचालकाने घरासमोरील झाडाला गमज्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मल्लप्पा सिध्दाराम पांढरे ( वय ३१, रा. हुच्चेश्वर नगर भाग २) असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.
मृत मल्लप्पा हा शनिवारी रात्री घरी आला. तेथून तो कोणालाही न सांगता तेथून घराजवळील आपट्याच्या झाडाला गमजा व निळी कापडी पट्टीच्या सहाय्याने गळफास घेतले. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली.
या घटनेची माहिती कळताच हवालदार डी. जी. नवले हे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्याला खाली उतरवून छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, डॉक्टरानी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती.