चप्पल पळवली म्हणून शेजाऱ्यानं कुत्र्याला मारलं; विचारणा केली असता मालकीनीलाही दिला चोप

By विलास जळकोटकर | Updated: April 17, 2023 17:19 IST2023-04-17T17:14:55+5:302023-04-17T17:19:42+5:30

ही  घटना रविवारी रात्री ९:३० सुमारास कुरुल येथे घडली.

A neighbor beaten a dog for running away with a slipper; When asked, beaten also the owner | चप्पल पळवली म्हणून शेजाऱ्यानं कुत्र्याला मारलं; विचारणा केली असता मालकीनीलाही दिला चोप

प्रतिकात्मक फोटो

सोलापूर : कुत्रा हा तसा इमानी प्राणी. घराचं, शेताचं इमानेइतबारे सेवा करतो. यात काही खोडकरही असतात. यामुळे मालकांवर आफत ओढावते. अशीच घटना सोलापूर जिल्ह्यातील कुरुल येथे घडली. कुत्र्यानं शेजाऱ्याची चप्पल पळवल्यानं शतकऱ्याने कुत्र्याला मारले. यावर विचारणा केली म्हणून त्याच्या मालकीनीलाही लाकडाने मारहाण केली. ही  घटना रविवारी रात्री ९:३० सुमारास कुरुल येथे घडली.

त्याचे असे झाले, कुरुल येथील अनिल पवार यांच्या घरी त्यांनी एक कुत्रे पाळलेले आहे. रविवारी रात्री ९:३० च्या सुमारास त्याने शेजारी राहणाऱ्या लोकांच्या घराबाहेर ठेवलेली चप्पल पळवून नेली. चिडलेल्या शेजाऱ्यांनी या कुत्र्याला मारहाण केली. हे समजताच सुनीता अनिल पवार (वय- ४०) या विचारणा करण्यासाठी गेल्या. यावरुन शेजाऱ्याने लाकडाने सुनीता यांना मारहाण केल्यानं त्यांच्या डाव्या हाताला मुका मार लागला. सोमवारी सकाळी कामती येथील सरकारी दवाखान्यात उपचार करुन त्यांच्या मुलीने त्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 
 

Web Title: A neighbor beaten a dog for running away with a slipper; When asked, beaten also the owner