शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कारमधील कुटुंबीयांवर जीवघेणं संकट, ट्रॅफिक पोलिसांमुळे मोठा अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 10:30 IST

सोलापूर शहरातील शांती चौक येथून स्विफ्ट कारमध्ये एक कुटुंब दिवाळीनिमित्त प्रवास करत होते

सोलापूर - ट्रॅफिक पोलिसांबद्दल नेहमीच वाहनधारकांच्या मनात भीती आणि चीड असते. वाहतूक पोलीस हवालदार म्हटलं की गाडी अडवणार आणि दंड भरावा लागणार, अशी आपली समजूत असते. अनेकदा वाहतूक पोलिसांसोबत बाचाबाचीही होत असते. मात्र, आपल्या सुरक्षितेसाठी, सुरक्षित प्रवासासाठीच ते वारंवार आपल्यासोबत हुज्जत घालत असतात. त्याला काही अपवादही असू शकतात. सोलापूरातील वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याची घटना समोर आली आहे. 

सोलापूर शहरातील शांती चौक येथून स्विफ्ट कारमध्ये एक कुटुंब दिवाळीनिमित्त प्रवास करत होते. सोलापूर अक्कलकोट मार्गावरील चौकात स्विफ्ट कार आल्यावर या कारमधील सीएनजी टाकीतून वायु गळती होत असल्याचं तिथे असेलल्या वाहतूक पोलिसाच्या ते लक्षात आलं. त्यांनी ताबडतोब कार थांबवत कारमधील कुटुंबाला बाहेर काढलं. तातडीनं अग्निशामक दलाला माहिती दिली. अग्निशामक दलाने घटनास्थळी दाखल होत सदर वाहनाची गॅस गळती बंद केली. वाहतूक पोलिसाच्या सतर्कतेमुळे एका कुटुंबाला जीवनदान मिळालं. संबंधित चारचाकी कारचा नंबर PB 08 DW 9897 असा आहे. यावेळी, गाडीच्या ठिकाणी स्थानिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती. तर, काही वेळासाठी रस्त्यावरील वाहतूकही थांबली होती. 

दरम्यान, वाहतूक पोलिसांचे संबंधित कुटुंबीयांनी आभार मानले. तसेच, अग्निशमन दलाचेही आभार मानले. ट्रॅफिक पोलीस केवळ पावत्याच न फाडता वाहनधारकांच्या सुरक्षेचीही काळजी घेत असतात, हेही या प्रसंगातून दिसून आले. 

टॅग्स :SolapurसोलापूरTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसFire Brigadeअग्निशमन दल