धक्कादायक; शासकीय रूग्णालयातील डॉक्टरची हॉस्टेलच्या टेरेसवर आत्महत्या
By Appasaheb.patil | Updated: February 14, 2023 15:55 IST2023-02-14T15:54:00+5:302023-02-14T15:55:20+5:30
या घटनेची माहिती मिळताच शासकीय रूग्णालयातील हॉस्टेल परिसरात शहर पोलिसांनी धाव घेतली.

धक्कादायक; शासकीय रूग्णालयातील डॉक्टरची हॉस्टेलच्या टेरेसवर आत्महत्या
सोलापूर : येथील शासकीय रूग्णालयातील एका डॉक्टराने हॉस्टेलच्या टेरेसवर जाऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास समोर आली. गौरव राजू वखारे (२५, रा. विवेकानंद नगर, भगवान बाबा चौक, अंबोजोगाई, ता. बीड) असे आत्महत्या करणाऱ्या डॉक्टराचे नाव आहे.
या घटनेची माहिती मिळताच शासकीय रूग्णालयातील हॉस्टेल परिसरात शहर पोलिसांनी धाव घेतली. सध्या घटनास्थळावर रूग्णालयातील डॉक्टरांनी मोठी गर्दी केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिस डॉक्टराचा मृतदेह खाली उतरविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मयत गौरव हा बीड जिल्ह्यातील रहिवाशी असून मागील काही वर्षापासून तो शासकीय रूग्णालयात डॉक्टर पदवीचे शिक्षण घेत आहेत. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, एक बहिण असा परिवार आहे.