शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कार मालट्रकवर आदळून सराफ व्यावसायिक जागीच ठार

By दिपक दुपारगुडे | Updated: May 21, 2024 17:49 IST

जखमीवर सांगोला ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात इतका भीषण होता की कार चक्काचूर झाली.

सोलापूर  : भरधाव कार पाठीमागून मालट्रकवर जोरात आदळून झालेल्या भीषण अपघातात डोक्यास गंभीर मार लागल्याने सराफ व्यावसायिक जागीच ठार झाला तर त्यांचा मुलगा जखमी झाला. जखमीवर सांगोला ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात इतका भीषण होता की कार चक्काचूर झाली.

हा अपघात सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास सांगोला-मिरज महामार्गावर जुनोनी जवळ घडला. सतीश रामहरी कदम (वय ४५, रा. सध्या बंगळुरू, मूळ रा.रानंद, ता. माण, जि. सातारा) असे मृत सराफ व्यावसायिकाचे नाव आहे. वरद सतीश कदम (वय १२, रा. रानंद, ता. माण, जि. सातारा) असे जखमी मुलाचे नाव आहे. याबाबत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगोला पोलिसात खबर दिली आहे.

सतीश कदम यांचे बंगळुरू शहरात सोने-चांदीचे दुकान आहे. उन्हाळी सुट्टीत सतीश कदम कुटुंबासह गावी रानंदला आले होते. सोमवारी रात्री ९ च्या सुमारास सतीश कदम व त्यांचा मुलगा वरद असे दोघेजण पितापुत्र मिळून रानंद येथून कार (एम. एच. १२ / एस. यू. ३२३३) मधून पंढरपूर, विजापूर मार्गे बंगळुरूला निघाले होते. मध्यरात्री ते पंढरपुरात आल्यावर त्यांचा रस्ता चुकला आणि ते विजापूर रोडने न जाता सरळ सांगोला मार्गे नागजकडे निघाले होते. वाटेत सांगोला-मिरज महामार्गावर जुनोनी गावाजवळ त्यांची कार पाठीमागून समोरील मालट्रकवर जोरात आदळली. या अपघातात सतीश कदम यांच्या डोक्याला गंभीर मार लागून ते जागीच मरण पावले तर त्यांच्या शेजारी डाव्या सीटवर बसलेला मुलगा वरद जखमी झाला.

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघात