सोलापूर : मित्रानेच केला मित्राचा खून; चिप्पा मंडईतील खुनातील मृत युवकाची ओळख पटली
By Appasaheb.patil | Updated: January 16, 2023 14:38 IST2023-01-16T14:36:38+5:302023-01-16T14:38:17+5:30
रविवारी झालेल्या खुनातील मृत व्यक्तीची ओळख पटली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सोलापूर : मित्रानेच केला मित्राचा खून; चिप्पा मंडईतील खुनातील मृत युवकाची ओळख पटली
सोलापूर : शहरातील अशोक चौक परिसरातील चिप्पा भाजी मंडईत रविवारी झालेल्या खुनातील मृत व्यक्तीची ओळख पटली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मयत बाबू उर्फ बबलू गुलाम हुंडेकरी (वय ३५, रा. पद्मा नगर मज्जित जवळ, सोलापूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याप्रकरणात शहर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. मयत बबलू आणि संशयित आरोपी बसवराज रविंद्र हतनुरे हे दोघे एकाच परिसरात राहतात. हे दोघेही लहानपणापासून मित्र आहेत. अशोक चौक परिसरातील चिप्पा मार्केटमध्ये बबलू हुंडेकरी याचा डोक्यात फरशी घालून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. ही घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारात उघडकीस आली होती. खून केलेल्या आरोपीच्या शोधासाठी शहर पोलिसांनी काही पथके तैनात केली हाेती. तपास अगदी वेगाने सुरू होता. सोमवारी सकाळच्या सुमारास पोलिसांनी एकाला संशयित म्हणून ताब्यात घेतले असून अधिक चौकशी सुरू असल्याचे पोलीस निरिक्षक चिंताकंदी यांनी सांगितले.
दरम्यान, मयताची ओळख पटल्यानंतर संबंधित नातेवाईकांना बोलविण्यात आले. त्यानंतर नातेवाईकांनी ओळख पटल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यास होकार दिल्याचेही पोलिसांनी सांगितले. बबलूचा खुन का कशासाठी केला याबाबतची माहिती संकलित करण्याच्या दृष्टीने पोलिस तपास करीत आहेत.