पन्नास वर्षाच्या प्रौढानं केलं तेरा वर्षाच्या मुलीशी लज्जास्पद वर्तन

By रवींद्र देशमुख | Published: May 9, 2024 07:42 PM2024-05-09T19:42:45+5:302024-05-09T19:43:33+5:30

विनयभंगाचा गुन्हा : वारंवार पाठलाग करायचा; पिडितेची तक्रार

A fifty-year-old man behaved shamefully with a thirteen-year-old girl | पन्नास वर्षाच्या प्रौढानं केलं तेरा वर्षाच्या मुलीशी लज्जास्पद वर्तन

पन्नास वर्षाच्या प्रौढानं केलं तेरा वर्षाच्या मुलीशी लज्जास्पद वर्तन

सोलापूर: घराजवळच्या दोरीवर कपडे वाळवत घातलेले कपडे काढत असताना १३ वर्षाच्या मुलीशी ४९ वर्षाच्या प्रौढानं लज्जास्पद वर्तन करण्याची घटना शहरातील एका झोपडपट्टीत घडली. या प्रकरणी गुरुवारी विनयभंगाचा गुन्हा नोंदला आहे. लक्ष्मण ग्यानोबा बोडू (वय- ४९) असे या गुन्हा दाखल झालेल्या प्रौढाचे नाव असूवन, त्याला अटक करुन न्यायालयीन कोठडी मिळवली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, यातील पिडिता शहरातील एका झोपडपट्टीत वास्तव्यास आहे. बुधवारी दुपारच्या वेळी ती घराजवळ दोरीवर वाळवत ठेवलेले कपडे काढत होती. या दरम्यान, जवळच राहणारा प्रौढ पाठिमागून आला आणि त्याने गळ्याला काय लागले आहे म्हणत तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. यापूर्वीही त्याने पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. झाल्या प्रकाराबद्दल आईला सांगण्यासाठी पिडिता जात असताना तो तिच्या शाळेसमोर थांबला होता, यावेळीही त्याने डोळे मिचकावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी पिडितेने नातलगासमवेत जेलरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावर पोलीस निरीक्षक बिराजदार, महिला सहा. पोलीस निरीक्षक जोत्सना भांबिष्टे, फौजदार राठोड यांनी तिचे गाऱ्हाणे ऐकून घेऊन संबंधीत आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला. त्याला बुधवारच्या रात्री उशिरा ताब्यात घेऊन अटक केली. गुरुवारी न्यायालयात उभे करण्यात आले. न्यायालयाने त्याची न्यायालयीन पोलीक कोठडीत रवानगी केली. अधिक तपास सपोनि भांबिष्टे करीत आहेत.

Web Title: A fifty-year-old man behaved shamefully with a thirteen-year-old girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.