भांडगावातील शेतमजुराची गळफास घेऊन आत्महत्या
By काशिनाथ वाघमारे | Updated: July 14, 2023 20:47 IST2023-07-14T20:46:56+5:302023-07-14T20:47:02+5:30
सोलापूर : शेतात कामावर जातो म्हणून घराबाहेर पडलेला एक मजूर लिंबाच्या झाडाला गमचाने गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या अवस्थेत आढळून ...

भांडगावातील शेतमजुराची गळफास घेऊन आत्महत्या
सोलापूर : शेतात कामावर जातो म्हणून घराबाहेर पडलेला एक मजूर लिंबाच्या झाडाला गमचाने गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या अवस्थेत आढळून आला. शेषेराव दशरथ अंधारे (वय ५५, रा. भांडगाव, ता. परांडा), असे आत्महत्या केलेल्या शेतमजुराचे नाव असून शुक्रवार, १४ जुलै रोजी दुपारी १ वाजेदरम्यान धस पिंपळगाव (ता. बार्शी) हद्दीत चांदणी नदीच्या पुलाजवळ एका लिंबाच्या झाडास गळफास घेतलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह आढळून आला.
याबाबत मेहुणे मनोज तुकाराम जामदार (वय ४३, रा. भांडगाव) यांनी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात याबाबत खबर दिली आहे. पोलिस सूत्रांकडील माहितीनुसार, शेषेराव दशरथ अंधारे यांना थोडीशी शेती असून ते दुसऱ्यांच्याही शेतात मजूर म्हणून कामावर जातात. ते शनिवार, १४ जुलै २०२३ रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास कामाला जातो असे सांगून घराबाहेर पडले.
त्यानंतर धस पिंपळगाव हद्दीत चांदणी नदीच्या पुलाजवळ एका लिंबाच्या झाडास केशरी रंगाच्या गमचाने गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या अवस्थेत आढळून आले. याबाबत बार्शी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद झाली आहे. पोलिस त्याच्या आत्महत्येमागील कारणांचा शोध घेत असून, अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल गोरख भोसले हे करीत आहेत.