शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरात विमान लँड होताच समोर आला कुत्रा; पायलटची उडाली भंबेरी, सुरक्षा रक्षकही धास्तावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 11:12 IST

सुदैवाने या प्रकारामुळे विमानतळावर कुठलीही दुर्घटना घडली नाही. या घटनेची दखल कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली आहे.

सोलापूर - सोलापूर विमानतळावर सोमवारी एक विचित्र घटना घडली त्यामुळे वैमानिक काहीसे घाबरले. सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी गोव्याहून आलेले विमान सोलापूर विमानतळावर लँड होताना एक कुत्रा अचानक आडवा आला. विमानासमोर जाणाऱ्या कुत्र्याला हाकलून लावण्यासाठी विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. मात्र सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवले. सुदैवाने यात कुठलीही अनुचित घटना घडली नाही.

या घटनेने पायलट जाम घाबरले असून त्यांनी फ्लाय ९१ कंपनीकडे तोंडी तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी सकाळी ८ वाजून २८ मिनिटांनी गोव्याहून फ्लाय ९१ चे विमान सोलापूर विमानतळावर लँड होण्याची तयारी सुरू केली. बरोबर ८ वाजून ३० मिनिटांनी विमान लँड झाले, त्यावेळी पार्किंग जागेवर अचानकपणे एक कुत्रा विमानासमोर धावून जाताना दिसला. त्यामुळे सर्वांची धावपळ सुरू झाली. विमान पार्किंगच्या दिशेने येत असल्याने कर्मचाऱ्यांनाही पुढे जाता आले नाही. सुरक्षा रक्षकांनी अडवल्याने कर्मचारीही तिथेच थांबले. विमानासमोर धावून जाणारा कुत्रा अचानक थांबला. त्यामुळे वैमानिकांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. 

सुदैवाने या प्रकारामुळे विमानतळावर कुठलीही दुर्घटना घडली नाही. या घटनेची दखल कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली आहे. याबाबत विमानतळाचे सहाय्यक व्यवस्थापक अंजनी शर्मा यांना विचारले असता, त्यांनी माहिती घेऊन सांगते असं उत्तर दिले. विमानतळावर घिरट्या घालणाऱ्या पक्षांचाही बंदोबस्त करण्याची मागणी विमानतळ प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला केली आहे. 

विमानतळावरील पीओपीचा भाग पडला

दरम्यान, सोलापूर विमानतळाचे लोकार्पण होऊन जवळपास ८ महिने उलटले आहेत. २८ कोटी रुपये खर्च करून विमानतळाचे नुतनीकरण करण्यात आले. २ दिवसापूर्वी विमानतळावरील वेटिंग रूमधील पीओपी छताचा काही भाग खाली पडल्याचे प्रवाशांना दिसून आले. त्यामुळे प्रवाशांनी तुटलेल्या पीओपीचे व्हिडिओ शुटींग करून सोशल मीडियावर व्हायरल केले. विमानतळाच्या नूतनीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे मत सोलापूरकरांनी मांडले आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूर