शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

शाळेतून तास संपवून गावी निघालेल्या अल्पवयीन मुलिला छेडणाऱ्यावर गुन्हा

By काशिनाथ वाघमारे | Updated: April 25, 2023 17:22 IST

ही घटना २४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास परांडा रोडवरील बायपास चौकात घडली. याबाबत संबंधीत मुलीने तक्रार देताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सोलापूर : बार्शी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी शाळेतील जादा तास संपवून सायकलवरून गावी निघाली असता, एकाने अडवून तिचा हात धरला आणि लग्न करू म्हणून छेडछाड केली. याप्रकरणी बार्शी तालुका पोलिसात किरण येळे या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

ही घटना २४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास परांडा रोडवरील बायपास चौकात घडली. याबाबत संबंधीत मुलीने तक्रार देताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला.पोलीस सूत्राकडील माहितीनुसार पीडित मुलगी दहावीत शिकत असून सध्या या शाळेत अतिरिक्त तास घेतले जात आहेत. ती सोमवारी सकाळी सायकलवरून शाळेला आली. सकाळी ११ वा. तास संपवून ती नेहमीप्रमाणे सायकलवरून तिच्या गावी निघाली होती. तो जवळ येऊन सायकल थांबवला. तिचा हात पकडून तू मला आवडतेस, लग्न करू, आई-वडीलाचा विचार करू नको म्हणाला. तिने मला शाळा शिकायची आहे .तू माझा पाठलाग करू नकोस, पोलीस स्टेशनला चल, गावी चल म्हणताच त्याने स्वारी...म्हणत तेथून पळ काढला. गावी घरी आल्यानंतर आईला हा प्रकार सांगितला. त्यानंतर दोघींनी तालुका पोलिस ठाणे गाठले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भालेराव करत आहेत. 

 

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSchoolशाळा