शिवसेनेचे जिल्हाप्रमूख मनिस काळजेसह दोघांविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा
By विलास जळकोटकर | Updated: February 22, 2024 18:01 IST2024-02-22T18:01:02+5:302024-02-22T18:01:30+5:30
सोलापूर : एक महिन्यापूर्वी चार चाकी वाहनाचा सौदा करुन एक लाख रुपये ॲडव्हान्स देऊन वाहन नेले, उर्वरित तीन लाख ...

शिवसेनेचे जिल्हाप्रमूख मनिस काळजेसह दोघांविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा
सोलापूर : एक महिन्यापूर्वी चार चाकी वाहनाचा सौदा करुन एक लाख रुपये ॲडव्हान्स देऊन वाहन नेले, उर्वरित तीन लाख रुपये अद्याप मिळाले नसल्याचे आपली फसवणूक झाल्याची तक्रार विठ्ठल दत्तात्रय मुनगापाटील (वय- ३९, सृष्टी नगर, अक्कलकोट नगर, सोलापूर) या व्यावसायिकानं दिल्याने शिवेसना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांच्यासह आकाश मुदगल या दोघांविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंदला आहे. ही घटना ४ जानेवारी ते आजतागायत घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी विठ्ठल मुनगापाटील यांचा जुनी चारचाकी वाहने विक्रीचा व्यवसाय आहे. फिर्यादी पुणे, मुंबई येथून चार चाकी वाहने विकत आणून सोलापूर शहरात विकतात. ४ जानेवारी रोजी फिर्यादीच्या ओळखीचे आकाश मुदगल यांनी मनिष निकाळजे यांना चारचाकी गाडी घ्यायची आहे, असे फिर्यादीला सांगितले. दोघांनाही फिर्यादीने गाडी दाखवली. त्यांनी गाडी पसंत केली. चार लाखाला व्यवहार ठरल्यानंतर काळजे यांनी १ लाख रुपये ॲडव्हान्स दिले. व गाडी सोबत घेऊन गेले, दोन दिवसात उर्वरित तीन लाख देण्याचे ठरले.
फिर्यादीचा विश्वास संपादन करुन गाडी घेऊन गेले मात्र आजतागायत पैसे मिळाले नाहीत. फिर्यादीकडील वाहन स्वत:चे म्हणून वापरले. आपली आर्थिक फसवणूक करुन दमदाटी केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. या प्रकरणी तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. व्ही. कुकडे करीत आहेत.