Solapur: पतीला खोटंनाटं सांगितल्याचा जाब विचारल्यानं महिलेशी गैरवर्तन, सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल
By विलास जळकोटकर | Updated: January 20, 2024 18:14 IST2024-01-20T18:13:51+5:302024-01-20T18:14:36+5:30
Solapur Crime News: पतीला पत्नीबद्दल चारित्र्यावर शिंतोडे उडेल असे सांगितल्याचा जाब विचारल्यावरुन हात धरुन घरात नेऊन असभ्य वर्तन केल्याबद्दल सातजणांविरुद्ध विनभंगासह अन्य कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.

Solapur: पतीला खोटंनाटं सांगितल्याचा जाब विचारल्यानं महिलेशी गैरवर्तन, सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल
- विलास जळकोटकर
सोलापूर - पतीला पत्नीबद्दल चारित्र्यावर शिंतोडे उडेल असे सांगितल्याचा जाब विचारल्यावरुन हात धरुन घरात नेऊन असभ्य वर्तन केल्याबद्दल सातजणांविरुद्ध विनभंगासह अन्य कलमान्वये गुन्हा नोंदला आहे. शहरातील एका वस्तीत ही घटना घडली. या प्रकरणी पिडित महिलेने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. गोविंद कांबळे, त्याची आई, पत्नी, मावशी, कैलास कांबळे, ऋषिकेश कांबळे अशी गुन्हा नोंदलेल्यांची नावे आहेत.
यातील फिर्यादीत म्हटले आहे की, पिडित महिला मुलाला दररोज स्कूल बसला सोडण्यासाठी दुचाकीवर येत होती. यावेळी वरील आरोपीही त्याच्या मुलास सोडण्यासाठी येत होता. गेल्या १५ दिवसांपासून तो पिडितेचा पाठलाग करीत होता. शुक्रवारी पिडितेचा पती मुलाला बसमध्ये सोडण्यासाठी आला असता आरोपीने पिडितेच्या चारित्र्याबद्दल खोटंनाटं सांगितले. दुपारी ३:३० च्या दरम्यान विचारणा करण्यास गेल्यानंतर वरील सर्वांनी मिळून घरात नेऊन असभ्य वर्तन केले. मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार सातजणांविरुद्ध गुन्हा नोंद असून, तपास सपोनि गायकवाड करीत आहेत.