पत्नीला उपाशी ठेवत मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा

By दिपक दुपारगुडे | Updated: May 26, 2023 18:14 IST2023-05-26T18:13:01+5:302023-05-26T18:14:51+5:30

फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

A case has been filed against the husband and three for mentally torturing the wife by starving her | पत्नीला उपाशी ठेवत मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा

पत्नीला उपाशी ठेवत मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा

दीपक दुपारगुडे, सोलापूर: माहेरून पैसे का आणत नाही म्हणत पत्नीला उपाशी ठेवून मानसिक त्रास दिल्याप्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत आरती सचिन ढेरे (वय २३, रा. बुधवार पेठ, वडगावकर वस्ती) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी आरती ढेरे यांचे सचिन ढेरे यांच्याशी २०२१ मध्ये विवाह झाला होता. यांना आरोपींनी माहेरून पैसे का आणत नाही, तुझ्या पेक्षा दुसरी मुलगी केली असती तर पैसे आणली असती, आम्ही दुसरे लग्न करतो या कारणासाठी विवाहितेला मारहाण करून उपाशी ठेवून मानसिक व शारीरिक छळ केला. अशा आशयाची फिर्याद आरती ढेरे यांनी दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पती सचिन ढेरे, सासू छाया ढेरे, नणंद सारिका ढेरे (सर्व. रा. स्वप्निल बंगला, सांगोला) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास भोसले करीत आहेत.

Web Title: A case has been filed against the husband and three for mentally torturing the wife by starving her