सोलापुरात चाकूने हल्ला चढवत आईसह तिघांना जखमी केल्याप्रकरणी मुलावर गुन्हा
By रूपेश हेळवे | Updated: April 20, 2023 16:49 IST2023-04-20T16:47:40+5:302023-04-20T16:49:33+5:30
कौटुंबिक कारणातून आरोपी महेश ताळीकोटी याचे आई व बहिणीशी वाद झाला.

सोलापुरात चाकूने हल्ला चढवत आईसह तिघांना जखमी केल्याप्रकरणी मुलावर गुन्हा
सोलापूर : कौटुंबिक कारणातून मुलाने आई, बहीण व भाऊजीवर चाकूने हल्ला करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी महेश सिद्राम ताळीकोटी ( रा. शेडम, गुलबर्गा) याच्यावर सदर बाझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना बुधवारी महापौर बंगला जवळील ऑर्किड अपार्टमेंटच्या पार्किंग भागात घडली.
या हल्ल्यात मनोज श्रीमंत कामनुरकर, प्रिया मनोज कामनुरक, कविता सिद्राम ताळीकोटी हे तिघे जखमी झाले आहेत. या प्रकरणी मनोज श्रीमंत कामनुरकर ( वय ४०, रा. बुधवार पेठ, अक्कलकोट ) यांनी फिर्याद दिली आहे.
कौटुंबिक कारणातून आरोपी महेश ताळीकोटी याचे आई व बहिणीशी वाद झाला. त्यावेळी रागाच्या भरात त्याने त्याची आई कविता ताळीकोटी यांना चापटा मारून डोक्यात वीट घातले. तसेच चाकूने त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या पाठीत खुपसले. त्यानंतर फिर्यादीची पत्नी प्रिया यांच्या पोटात खुपसुन उजव्या भुवईवर वार केले. त्यावेळी फिर्यादी मनोज हे सोडवण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्या बरगडीत चाकू खुपसून हनुवटीवर वार केले, अशा आशयाची फिर्यादी मनोज कामनुरकर यांनी दिली आहे.