पोलीस ठाण्याच्या लॉकअपजवळ संशयास्पद फिरणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा

By विलास जळकोटकर | Updated: March 13, 2024 17:54 IST2024-03-13T17:53:37+5:302024-03-13T17:54:23+5:30

या प्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्याचे हवालदार यांनी फिर्यादी दिली

A case against two suspicious loitering near police station lockup in solapur | पोलीस ठाण्याच्या लॉकअपजवळ संशयास्पद फिरणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा

पोलीस ठाण्याच्या लॉकअपजवळ संशयास्पद फिरणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा

सोलापूर : पोलीस ठाण्याच्या लॉकअप समोरील आवारामध्ये संशयास्पदरित्या वावरताना दोघेजण आढळून आले.  सकाळी १०:३० च्या सुमारास जेलरोड ठाण्याच्या परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसाच्या फिर्यादीनुसार दोघांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. नागेश प्रभाकर बंडी (रा. नवीन विडी घरकूल, कुंभारी, सोलापूर), विनायक संतोष भोसले (वय २७, जोशी गल्ली, रविवार पेठ, सोलापूर) अशी गुन्हा नोंदलेल्यांची नावे आहेत.

या प्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्याचे हवालदार यांनी फिर्यादी दिली असून, यात म्हटले आहे की, वरील दोन्ही आरोपी सकाळी १०:३० च्या सुमारास जेलरोड पोलीस ठाण्याच्या पुरुषांसाठीच्या लॉकअप परिसरात प्रवेशास बंदी असताना या परिसरात प्रवेश करुन संशयास्पद स्थितीत वावरताना फिर्यादीच्या निदर्शनास आले. या प्रकरणी वरिष्ठांना कल्पना देण्यात आली. त्यानंतर फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास फौजदार जाधव करीत आहेत.

 

Web Title: A case against two suspicious loitering near police station lockup in solapur