सोलापूरमध्ये कॅन्टीन व्यवसायिकाची घरात गळफास घेऊन आत्महत्या

By काशिनाथ वाघमारे | Updated: July 8, 2023 17:28 IST2023-07-08T17:28:38+5:302023-07-08T17:28:48+5:30

पांडुरंग हे बार्शीत कॅन्टीन चालवून उदरनिर्वाह करतात. बार्शी येथील फिर्यादीची आत्या अनुसया नाईकवाडी हिला शनिवारी सकाळी ही घटना सर्वप्रथम निदर्शनास आली. 

A canteen worker committed suicide by hanging himself at home in Solapur | सोलापूरमध्ये कॅन्टीन व्यवसायिकाची घरात गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूरमध्ये कॅन्टीन व्यवसायिकाची घरात गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : चहा कॅन्टीन चालवून प्रपंच चालवणा-या एका वृद्धाने घरात लोखंडी अँगलला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
पांडुरंग देविदास नाईकवाडी (६०, रा. अलीपूर रोड, बार्शी) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाने नाव असून शनिवार, ८ जुलै रोजी सकाळी ही घटना उघडकिस आली. मयताचे पुतणे धीरज विष्णू नाईकवाडी (२२ रा. अलिपूर रोड, ज्ञानेश्वर मठाजवळ, बार्शी) यांनी शहर पोलिसात खबर दिली आहे.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार नाईकवाडी कुटूंब अलीपूर रोडवर ज्ञानेश्वर मठाजवळ राहत असून त्यांचा मुलगा सतीश हा पुण्यात रहातो. मात्र पांडुरंग हे बार्शीत कॅन्टीन चालवून उदरनिर्वाह करतात. बार्शी येथील फिर्यादीची आत्या अनुसया नाईकवाडी हिला शनिवारी सकाळी ही घटना सर्वप्रथम निदर्शनास आली. 

तिने धीरजशी संपर्क साधून ही माहिती दिली. त्याने त्याचा चुलत भाऊ सतीश नाईकवाडी याच्याशी संपर्क साधून माहिती दिली. त्याचबरोबर पुतण्याने पोलीसात खबर दिली. नाईकवाडी यांच्या आत्महत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत असून तपास पोलिस नाईक डोईफोडे करत आहेत

Web Title: A canteen worker committed suicide by hanging himself at home in Solapur