शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Nirupam राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी माफी मागावी; EVM हॅक आरोपावरून शिवसेनेचा पलटवार
2
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
3
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
4
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
5
नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद
6
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
7
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
8
MHT CET 2024 Results: पैकीच्या पैकी! रिक्षाचालकाच्या मुलाची उत्तुंग झेप, MHT CET मध्ये १०० पर्सेंटाइल
9
संगमरवरी बांधकाम आणि बरंच काही! अमिताभ बच्चन यांच्या घरातल्या मंदिराचे सुंंदर Inside फोटो बघा
10
राम मंदिर उभारणीमुळे पराभव, शिंदे गटाच्या उमेदवाराचा दावा
11
Home Loan EMI च्या त्रासातून सुटका करायची असेल ही ट्रीक नक्की वापरा; गृहकर्ज संपेल
12
स्वानंदीने लक्ष्मीकांत बेर्डेंचा आतापर्यंत न पाहिलेला फोटो केला शेअर, चाहते करताहेत प्रेमाचा वर्षाव
13
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
14
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
15
"बिकिनी घालणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी कष्ट लागतात", पर्ण पेठे स्पष्टच बोलली
16
लाईफ इन्शुरन्स धारकांसाठी खूशखबर! पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास मिळणार पूर्वीपेक्षा अधिक पैसे
17
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
18
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
19
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
20
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या

जड वाहतुकीनं घेतला ९ वर्षाच्या बालकाचा बळी; मामाच्या गावी आलेल्या भाच्यावर काळाची झडप

By विलास जळकोटकर | Published: May 21, 2024 6:46 PM

सोलापुरात मामाच्या गावी आलेल्या तेलंगणातील भाच्यावर काळाची झडप.

सोलापूर : मामाकडे सोलापूरला सुट्टीसाठी आलेल्या तेलंगणा राज्यातील नऊ वर्षाच्या चिमुकला डंपरखाली चिरडून ठार झाला. मंगळवारी सकाळी १०:३० च्या सुमारास नई जिंदगी परिसरातील नागनाथ नगर रोडवर हा अपघात झाला. जड वाहतुकीचा आणखी एक बळी गेल्याचे समोर आले आहे. असद गौस शेख (वय- ९, रा. पद्मावती नगर, बोराबंडा, अकलापूर, जि. कुकाडपल्ली सध्या नागनाथ नगर, नई जिंदगी, सोलापूर) असे या मयत चिमुकल्याचे नाव आहे. यातील मयत बालक असद गौस शेख हा बालक तेलंगणा राज्यातील बोराबंडा, अकलापूर येथे राहतो. शाळेला सुट्टी असल्याने तो सोलापूरला आजोळी मामा व आजीकडे आलेला होता. 

सकाळी १०:३० च्या सुमारास तो मामासोबत मोटारसायकलीवरुन घरकूुलकडे जात होता. नागनाथ नगर, नई जिंदगी परिसरातील कच्च्या रस्त्यावरुन सुसाट वेगानं येणाऱ्या एम. एच. १३ डी क्यू ९१९६ हायवा डंबर वाहनानं पाठिमागून धडक दिली. यात मयत असद व मामा रोडवर पडले. भाच्चा असद हा हायवा वाहनाच्या पाठिमागच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाला. या घटनेची खबर एमआयडीसी पोलीस ठाण्याला मिळताच हवालदार एस. के. चव्हाण यांच्यासह पोलीस घटनास्थळी पोहचले. बेशुद्धावस्थेतील असद याला शासकीय रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. घटनास्थळी बघ्यांची गर्दीअपघाताची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. बघ्यांची एकच गर्दी झाली. पोलिसांनी प्रसंगावधान राखत गर्दी आटोक्यात आणून मयत बालकाला शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णायात पाठवले. जड वाहतुकीचा बळीनई जिंदगी नागनाथ नगर रस्ता कच्च्या स्वरुपाचा आहे, या मार्गावरुन जड वाहतुकला बंदी असतानाही वाहने बिनदिक्कत सुसाट वेगाने धावतात. यापूर्वीही शहर परिसरात जडवाहतुकीचे बळी गेले आहेत. त्यामध्ये आणखी एक भर पडली आहे. यावर पोलीस प्रशासनाकडून कारवाई व्हावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली.

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातDeathमृत्यू