चोवीस वर्षीय तरुणास खाली पाडून चाकूने वार, तिघांवर गुन्हा

By रूपेश हेळवे | Updated: October 10, 2023 16:21 IST2023-10-10T16:21:10+5:302023-10-10T16:21:23+5:30

सोलापूर : मागील भांडणाचा राग मनात धरून चाेवीसवर्षीय तरुणास तिघांनी मिळून चाकूने मारून जखमी केले. ही घटना जिल्हा परिषद ...

A 24-year-old youth was knocked down and stabbed with a knife, a crime against three | चोवीस वर्षीय तरुणास खाली पाडून चाकूने वार, तिघांवर गुन्हा

चोवीस वर्षीय तरुणास खाली पाडून चाकूने वार, तिघांवर गुन्हा

सोलापूर : मागील भांडणाचा राग मनात धरून चाेवीसवर्षीय तरुणास तिघांनी मिळून चाकूने मारून जखमी केले. ही घटना जिल्हा परिषद शाळा, बेलाटी (ता. उ. सोलापूर) येथे मंगळवारी सकाळी घडली.

याप्रकरणी सचिन प्रकाश ढेपे (वय २४, रा. पाकणी फाटा, पाकणी आश्रम शाळेजवळ, सोलापूर) याने दिलेल्या फिर्यादीवरून बबलू राठोड, सागर जाधव, शुभम शेंडगे (रा. बेलाटी, ता. उ.सोलापूर) याच्याविरोधात सलगर वस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितलेली हकीकत अशी की, फिर्यादी सचिन ढेपेे हा जिल्हा परिषद शाळा, बेलाटी येथे थांबला असताना बबलू, सागर व शुभम यानी मागील भांडणाचा राग मनात धरून फिर्यादीस शिवीगाळ, दमदाटी करून खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याचवेळी सागर जाधव याने फिर्यादीच्या उजव्या दंडावर चाकूने मारून जखमी केले. या घटनेची नोंद सलगर वस्ती पोलिस ठाण्यात झाली आहे.
 

Web Title: A 24-year-old youth was knocked down and stabbed with a knife, a crime against three