शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

सोलापुरातून बाहेर जाण्यासाठी ८७ हजार अर्ज; ४६ हजार लोकांनी सोलापूर सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 12:21 IST

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती; परराज्यातील लोकांसाठी श्रमिक ट्रेनची व्यवस्था

ठळक मुद्देआतापर्यंत विशेष आठ रेल्वेने १० हजार ४३ स्थलांतरितांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात आले २३ आणि २४ मे रोजी पंढरपूर येथून जोधपूर व सोलापुरातून हावडा येथे रेल्वेने पाठविण्यात येणारअद्याप शहरातील ३३९० तर जिल्ह्यातील ७६१२ अशा ११ हजार २ व्यक्ती गेलेल्या नाहीत

सोलापूर : सोलापुरातून बाहेरील जिल्ह्यात जाण्यासाठी ५७ हजार १७६ जणांनी तर परराज्यात जाण्यासाठी २९,९३२ जणांनी अर्ज केले एकूण अर्जांची संख्या ८७,०४८ इतकी आहे़ परराज्यातील नागरिकांना त्या त्या राज्यात पोहोच करण्यासाठी रेल्वे विभागाच्या मदतीने श्रमिक ट्रेन या नियोजित तारखेनुसार सोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

लॉकडाऊनमुळे सोलापुरात परराज्यातील विस्थापित कामगार, धार्मिक यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी व इतर व्यक्ती अडकल्या होत्या. १ मेपासून अशा व्यक्तींना आपल्या जिल्ह्यात व राज्यात जाण्यासाठी परवाने देण्यास सुरुवात करण्यात आली. आपल्या मूळ जिल्हा किंवा राज्यात जाण्यासाठी अशा लोकांनी महापोलीस वेबसाईटवर अर्ज केले व त्यांना परवाने देण्याचे काम जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. 

शहरातून पोलीस आयुक्तांकडे २२ हजार, जिल्ह्यातून पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे ३४ हजार ९०४ आणि निवारा केंद्रातील २७३ जणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे बाहेरगावी जाण्यासाठी परवानगीसाठी अर्ज केले होते. अर्ज केलेल्यांना आपल्या गावी जाण्यासाठी परवाने देण्यात आले आहेत. त्यानुसार पोलीस आयुक्तालयाकडे अर्ज केलेल्या १८ हजार ६१०, जिल्ह्यातील २७ हजार २९१ आणि निवारा केंद्रातील २७३ असे ४६ हजार १७४ जण रवाना झाले आहेत. अद्याप शहरातील ३३९० तर जिल्ह्यातील ७६१२ अशा ११ हजार २ व्यक्ती गेलेल्या नाहीत. 

आणखी दोन रेल्वे जाणार- आतापर्यंत विशेष आठ रेल्वेने १० हजार ४३ स्थलांतरितांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात आले आहे. अद्याप राजस्थान व पश्चिम बंगाल येथील २९२० स्थलांतरित अडकलेले असून, २३ आणि २४ मे रोजी पंढरपूर येथून जोधपूर व सोलापुरातून हावडा येथे रेल्वेने पाठविण्यात येणार आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वे