सोलापूर जिल्ह्यात करणार ८५ लाख वृक्ष लागवड

By Appasaheb.patil | Published: July 3, 2019 06:31 PM2019-07-03T18:31:05+5:302019-07-03T18:32:54+5:30

पालकमंत्री विजय देशमुख यांच्या हस्ते उद्या होणार अभियानाचा शुभारंभ

85 lakhs of trees planted in Solapur district | सोलापूर जिल्ह्यात करणार ८५ लाख वृक्ष लागवड

सोलापूर जिल्ह्यात करणार ८५ लाख वृक्ष लागवड

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यात एक जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत अभियान राबवण्यात येणारसोलापूर जिल्ह्यास 85.52 लाख रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्टजिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन

सोलापूर : राज्य शासनाच्या वन विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या 33 कोटी वृक्ष लागवड अभियानात जिल्ह्यात 85.52 लाख वृक्ष लागवड केली जाणार आहे. यासाठी सुमारे 80 लाख खड्डे खोदून पूर्ण झाले असून  90.41 लाख रोपांची निर्मिती करण्यात आल्याची माहिती उपवनसंरक्षक पी. एच. बडगे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी राज्य शासनाकडून गेल्या तीन वर्षात 50 कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. 2017 मध्ये चार कोटी, 2018 मध्ये 13 कोटी आणि यंदा 33 कोटी वृक्ष लागवड केली जाणार आहे. जिल्ह्यातील वृक्ष लागवडीचा मुख्य कार्यक्रम पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते उद्या, गुरुवार 4 जुलै 2019 रोजी  सिध्देश्वर वन विहार येथे सकाळी नऊ वाजता होणार आहे, असेही श्री. बडगे यांनी सांगितले.

राज्यात एक जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत अभियान राबवण्यात येणार आहे. या कालावधीत सोलापूर जिल्ह्यास 85.52 लाख रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्ह्यातील वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विविध विभागांना उद्दिष्ट आहे. यापैकी वन विभागास 19.20 लाख, सामाजिक वनीकरण विभागास 12 लाख, ग्रामपंचायतींना 32.94 लाख, कृषी विभागास 2.10 लाख, रेशीम विकास विभागास 8.36 लाख तर ग्रामीण विकास विभागास 7 लाखांच्या वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सोलापूर महानगरपालिका 2.20 लाख रोपे लावणार आहे. रोपे लागवडीसाठी 78.47 लाख खड्डे खोदून पूर्ण झाले आहेत. या कामाची शासनाच्या संकेतस्थळावरही नोंद करण्यात आली आहे, असे बडगे यांनी सांगितले.   

वनविभाग, सामाजिक वनीकरण आणि रेशीम विकास विभाग उद्दिष्टापेक्षा जास्त रोपे लागवड करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात  उद्दिष्टापेक्षा जास्त रोपांची लागवड होईल, असा विश्वास बडगे यांनी व्यक्त केला .
-----------
90.41 लाख रोपांची निर्मिती
वृक्ष लागवडीसाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून 50.05 लाख तर वनविभागाकडून 40.36 लाख रोपांची तयारी करण्यात आली आहेत. सामाजिक वनीकरण विभाग जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीना रोपांचा पूरवठा करणार आहे. इतर विभागांना वन विभागाकडून रोपे पुरवली जाणार आहेत, असे बडगे यांनी सांगितले.
-------------
जिल्हा परिषदेला सर्वाधिक उद्दिष्ट
 जिल्ह्यातील वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाला सात लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वन विभाग 19.20 लाख, सामाजिक वनीकरण विभाग 12 लाख, कृषी  2.10 लाख, रेशीम विकास विभाग 8.36 लाख, तर महानगरपालिका 2.20 लाख रोपे लावणार आहे, असे  बडगे यांनी सांगितले.

Web Title: 85 lakhs of trees planted in Solapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.