शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
4
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
5
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
6
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
7
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
8
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
9
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
10
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
11
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
12
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
13
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
14
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
15
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
16
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
17
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
18
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
19
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
20
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...

सोलापूर जिल्ह्यात ‘मिसमॅच’च्या यादीतील ८० हजार शेतकरी कर्जमाफीला अपात्र, तालुकास्तरीय समितीने केली तपासणी, पात्र ठरले फक्त ४० हजार खातेदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 4:19 PM

‘मिसमॅच’ च्या एक लाख २१ हजार ९०७ वर गेलेल्या खातेदारांच्या तालुकास्तरीय समितीच्या तपासणीत ७९ हजार ६९४ खातेदार अपात्र झाले आहेत.

ठळक मुद्देपात्र झालेल्या ४० हजार ६९३ पैकी कर्जमाफीच्या यादीत किती शेतकरी येणार?छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी  सन्मान कर्जमाफी योजनेसाठी शेतकºयांच्या आतापर्यंत तीन प्रकारच्या याद्या बँकांना दिल्या आहेत.सहकार खात्यावर कर्जमाफीचा पडलेला ताण काहीअंशी तरी कमी झाला आहे. 

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १६ :  ‘मिसमॅच’ च्या एक लाख २१ हजार ९०७ वर गेलेल्या खातेदारांच्या तालुकास्तरीय समितीच्या तपासणीत ७९ हजार ६९४ खातेदार अपात्र झाले आहेत. पात्र झालेल्या ४० हजार ६९३ पैकी कर्जमाफीच्या यादीत किती शेतकरी येणार?, हे आता शासनाच्या निकषावर अवलंबून आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी  सन्मान कर्जमाफी योजनेसाठी शेतकºयांच्या आतापर्यंत तीन प्रकारच्या याद्या बँकांना दिल्या आहेत. ग्रीन, यलो व मिसमॅच अशा तीन याद्यांची तपासणी पूर्ण झाली आहे. ग्रीन व यलो यादीची तपासणी होऊन पात्र व अपात्र यादीही बँकांनी शासनाला पाठवली आहे. शेवटची ‘मिसमॅच’ यादी बँकांना दिली होती. जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या ७५ हजार २२ शेतकºयांची  यादी तालुकास्तरीय समितीने तपासणी पूर्ण केली असता ३३ हजार २२६ खातेदार पात्र तर ४१ हजार ६५२ शेतकरी अपात्र झाले आहेत. राष्टÑीय बँकांच्या ४६ हजार ८८५ खातेदारांच्या तपासणीत ७ हजार ४६७ पात्र तर ३८ हजार ४२ शेतकरी अपात्र झाले आहेत. अपात्र झालेल्या खातेदारांचे पुढे काय?, याचा निर्णय शासन स्तरावर झालेला नाही; मात्र पात्र झालेल्यांपैकी किती खातेदारांची नावे कर्जमाफीच्या यादीत येणार?, याकडेही लक्ष लागले आहे. कारण ‘ मिसमॅच’ यादीही खातेदारांची असून शासनाच्या निकषात कुटुंब गृहीत धरुन कर्जमाफी दिली जाते. त्यामुळे यापूर्वी एखाद्या कुटुंबातील किंवा एखाद्या व्यक्तीचे नाव यापूर्वी ग्रीन व यलो यादऊ यादीत पात्र झालेल्यांचे नाव कर्जमाफीला पात्र राहणार नाही. यामुळे पात्र झालेल्यांपैकी अनेकांची नावे कर्जमाफीच्या यादीतून बाहेर पडणार आहेत. ---------------------सहकार खात्याचा ताण कमी- कर्जमाफीच्या सर्व प्रकारच्या याद्या सहकार खात्याने तपासणी करुन बँकांना व शासनाला पाठविल्या असून पात्र झालेल्यांसाठी शासनाकडून पैसे आल्यानंतर बँकांना पुढील काम करावे लागणार आहे. सहकार खात्यावर कर्जमाफीचा पडलेला ताण काहीअंशी तरी कमी झाला आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरी