उदनवाडी, संगेवाडी, जवळा, कमलापूरमधील धाडीत ७ हजारांची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:12 IST2021-01-08T05:12:41+5:302021-01-08T05:12:41+5:30
सांगोला : ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत पोलिसांनी अचानक चार वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून ७,१२४ रुपयांच्या १३५ देशी दारूच्या बाटल्यांसह, ...

उदनवाडी, संगेवाडी, जवळा, कमलापूरमधील धाडीत ७ हजारांची दारू जप्त
सांगोला : ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत पोलिसांनी अचानक चार वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून ७,१२४ रुपयांच्या १३५ देशी दारूच्या बाटल्यांसह, २० लीटर हातभट्टीची दारू असा सुमारे ७ हजार ७३९ रुपयांचा मद्यसाठा जप्त केला.
६ जानेवारी रोजी कमलापूर, उदनवाडी, संगेवाडी व जवळा (ता. सांगोला) येथे पोलिसांनी धाडी टाकून हातभट्टी जप्त केली.
सांगोला तालुक्यात ६१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारांचा प्रचार सुरू झाला आहे. निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून सांगोला पोलिसांकडून अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
पोलिसांनी बुधवारी कमलापूर येथील सीताराम ऐवळे याने घरामागे ११ देशी दारूच्या बाटल्या, २० लीटरच्या प्लास्टिक कॅनमध्ये २० लीटर हातभट्टी दारू जप्त केली. उदनवाडी येथील सूर्यकांत बनसोडे याने घरामागे १० देशी दारूच्या बाटल्या बाळगल्या होत्या. संगेवाडी येथील एका महिलेच्या घराच्या पाठीमागून ९६ देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. इरय्या गुत्तेदार याच्याकडून जवळा रोडच्या बाजूला मका भट्टीशेजारी १८ देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. याबाबत पोलीस नाईक तुकाराम व्हरे, पोलीस नाईक नागनाथ वाकीटोळ, पोलीस नाईक विकास क्षीरसागर, महिला पोलीस कॉन्स्टेबल ज्योती सातवेकर यांनी फिर्याद दाखल केली आहे.