शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

६५ वर्षीय वयोवृध्द भाविकाची घोड्यावरून शिंगणापूर वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 16:28 IST

देवाच्या पावन नगरीत गेल्यानंतर एक आत्मिक समाधान मिळते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देभोसे गावचे रामचंद्र कोरके-पाटील हे ६५ व्या वर्षीही आनंदाने करतात शिंगणापूर वारी- दोन पिढ्यांपासून आमची ही वारी सुरू,  यंदाचे हे ३२ वर्षेमहाराष्ट्रात सांस्कृतीक आणि धार्मिक परंपरा जोपासल्या जातात

माळशिरस : डोक्यावर भगवा फेटा. पांढरा शर्ट अन् धोतर परिधान केलेले. पिशवीत गुंडाळून ठेवलेला भगवा झेंडा. घोड्याच्या पाठीवर जुजबी साहित्य लादून शिखर शिंगणापूरच्या मार्गाने स्वार होऊन निघालेले एक वृद्ध दिसले. त्यांचे नाव रामचंद्र कोरके-पाटील. भोसे (ता़ पंढरपूर) येथील ते रहिवासी. देवाच्या पावन नगरीत गेल्यानंतर एक आत्मिक समाधान मिळते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

रामचंद्र कोरके-पाटील यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, महाराष्ट्रात सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. अनेक कुटुंबात देवाला जाऊन वारी करण्याची परंपरा आहे. त्या परंपरेनुसारच आमच्याही कुटुंबात शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाला वारी करण्याची परंपरा आहे. पूर्वीच्या काळी दळणवळणासाठी बैलगाड्या, घोडा गाड्या वापरल्या जात होत्या. त्यांची जागा आता विविध प्रकारच्या वाहनांनी घेतली आहे. मात्र मी अद्यापही घोड्यावरूनच शिखर शिंगणापूरची वारी करतो. यंदाचे ३२ वे वर्षे असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या शिखर शिंगणापूरची यात्रा सुरू असून राज्यभरातून अनेक भाविक यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात येत आहेत. सध्या अनेक भाविक जीप, टेम्पो, मोटरसायकल अशा विविध वाहनांच्या साह्याने शिंगणापूरला ये-जा करतात, मात्र जुनी परंपरा जोपासत अजूनही घोड्यावरून मी प्रवास करतो.

दोन पिढ्यांपासून आमची ही वारी सुरू आहे. केवळ शिखर शिंगणापूरच नव्हे तर पंढरपूर, देहू, आळंदी, अरण अशा विविध तीर्थक्षेत्रांना ही मी घोड्यावरून जातो, असे त्यांनी सांगितले. सध्या प्रवासासाठी वापरला जाणारा घोडा सांभाळणे मुश्कील झाले आहे. इतकेच नाही तर पशूप्रेमही कमी झाल्याचे दिसून येते. मात्र आमच्या परिवारात कायम घोडा सांभाळला जातोय. ती परंपरा मीही सांभाळत आलो आहे, रामचंद्र कोरके-पाटील हे सांगत होते.

असा असतो नित्यक्रम

- रामचंद्र कोरके-पाटील म्हणाले, दररोज मोजका प्रवास करायचा. मुक्कामाच्या ठिकाणी लवकरच थांबायचं. वाटेतील गावामध्ये महादेवाचे मंदिरातच मुक्काम करायचा. पुन्हा सकाळी लवकर प्रवासाला लागायचे. शक्यतो सकाळी आणि सायंकाळी प्रवास करतो. दुपारी उन्हात विश्रांती करतो़, असा दिनक्रम आहे. शिखर शिंगणापूरला पोहोचल्यानंतर शिखराला प्रदक्षिणा घालायची व माघारी फिरायचे असा प्रतिवर्षी करतो, असे ते सांगत होते. 

टॅग्स :Solapurसोलापूर