शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

सोलापूर जिल्ह्यातील ६२० बालके हृदयरोगी, शस्त्रक्रियेस पालकांचा नकार, दैवावर हवाला ठेवून जगताहेत २२ बालके !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 11:47 IST

शहर आणि ग्रामीण भागातील आरोग्य बिघडत असल्याचे वास्तव राष्ट्रीय आरोग्य अभियान व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यामार्फत पुढे आले आहे. मागील चार वर्षांत जिल्ह्यात  ६२० बालके हृदयरोगाने पिडीत असल्याचे आढळून आले

ठळक मुद्देआरोग्य तपासणी करण्यासाठी तालुकानिहाय पथकाची स्थापना बालकांच्या पालकांनी हृदयविकाराची शस्त्रक्रिया करण्यास नकार दिलामहात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत शस्त्रक्रिया केल्या जातात

अमित सोमवंशीसोलापूर दि १९  : शहर आणि ग्रामीण भागातील आरोग्य बिघडत असल्याचे वास्तव राष्ट्रीय आरोग्य अभियान व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यामार्फत पुढे आले आहे. मागील चार वर्षांत जिल्ह्यात  ६२० बालके हृदयरोगाने पिडीत असल्याचे आढळून आले असून त्यापैकी  ५९८ मुलांवर हृदयविकाराची शस्त्रक्रिया करण्यात आली. २२ बालकांच्या पालकांनी शस्त्रक्रियेला नकार दिल्याने त्यांचा  जीव धोक्यात असून दैवावर हवाला ठेवून ही बालके जगत असल्याचे वास्तव पुढे आले आहे.राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत तज्ज्ञ डॉक्टरांकडून वर्षभरात दोन वेळा विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येते. ज्यांना हृदयविकार आहे, अशांना शस्त्रक्रियेसाठी सोलापूर, पुणे व मुंबई अशा विविध ठिकाणी पाठविण्यात येते. शस्त्रक्रियेसाठी पाठविलेल्या एका विद्यार्थ्यासोबत असलेल्या एका नातेवाईकाचा पूर्ण खर्चसुद्धा मोफत करण्यात येतो. जिल्ह्यातील अंगणवाड्या व पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.यात सोलापूर जिल्ह्यात २०१४ ते २०१७ दरम्यान राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत ० ते ६ वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात ३६१ बालके हृदयरोगाने पीडित आढळले. त्या सर्वांवर शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे दिसून आले. त्यापैकी ३०० बालकांवर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तसेच शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात ३७२ जणांना हृदयरोग असल्याचे निष्पन्न झाल्यावर २९८ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शस्त्रक्रिया मोफत होत्या. तरीही २२ पालकांनी शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला आहे. १३५ विद्यार्थ्यांचे प्रस्ताव तयार करण्यात आले असून त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. काही विद्यार्थ्यांचा                 हृदयविकार औषधोपचाराने ठीक होणार असल्याचे तपासणीत दिसून आले. तर काही पालकांनी खासगी रुग्णालयात त्यांच्या पाल्यावर उपचार केले.

-----------------------आरोग्य तपासणीसाठी पथकेसोलापूर जिल्ह्यात विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी तालुकानिहाय पथकाची स्थापना करण्यात आली आहे. यात सोलापूर महानगरपालिका ५, मंगळवेढा ३, मंद्रुप ४, पंढरपूर ५, करकंब १, वडाळा ४, मोहोळ ४, करमाळा ३, बार्शी ३, पांगरी १, सांगोला ५, कुर्डूवाडी / माढा ४, अक्कलकोट ४, माळशिरस ७ अशी पथके स्थापन करण्यात आली आहेत.-----------------शस्त्रक्रिया होणारच! बालकांच्या पालकांनी हृदयविकाराची शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला आहे; मात्र बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात येतील. त्यासाठी पालकांना समजावून सांगण्यात येईल. पालकांची भेट घेऊन त्यांना मानसिकदृष्ट्या तयार करण्यात येईल. ते तयार झाल्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात येतील, असे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.-------------काय आहे योजना ?राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत बालकांची आरोग्य तपासणी दरवर्षी केली जाते. या तपासणीत विविध आजारांनी पीडित बालकांवर शस्त्रक्रियेची गरज असल्याचे दिसून आले. महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत शस्त्रक्रिया केल्या जातात. एका शस्त्रक्रियेसाठी २ ते ८ लाख रुपयांचा खर्च असतो.

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्य