बार्शी तालुक्यात पांगरी येथे शिवाजी तुळशीराम गोडसे (रा. गोडसे गल्ली, पांगरी) या ५३ वर्षीय व्यक्तीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवार, २१ जानेवारी रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याबाबत अशोक तुळशीराम गोडसे (वय ६०, रा. पांगरी) यांनी पांगरी पोलिसांत खबर दिली आहे.
शिवाजी गोडसे यांनी घरातील लाकडी आडूला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. रात्री १२ ते सकाळी सहा वाजतादरम्यान आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी घटनेची संपूर्ण माहिती घेतली. त्याच्या आत्महत्येमागील कारणाचा पोलिस शोध घेत आहेत.
दरम्यान, या घटनेची पांगरी पोलिसात नोंद झाली आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक फौजदार सतीश कोठावळे हे करत आहेत.