एटीएम कार्डची अदलाबदली करत वृध्दाच्या खात्यातून ५१ हजार काढले!
By रवींद्र देशमुख | Updated: December 29, 2022 17:53 IST2022-12-29T17:53:16+5:302022-12-29T17:53:38+5:30
फिर्यादी चिलवेरी ट्रेझरी शाखेच्या एटीएम सेंटर मधून पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांना पैसे काढता न आल्याने त्यांनी शेजारी थांबलेल्या दोन इसमांना मदत मागितली अन्...

एटीएम कार्डची अदलाबदली करत वृध्दाच्या खात्यातून ५१ हजार काढले!
सोलापूर : एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या वृध्दाच्या एटीएम कार्डची अदलाबदली करत त्यांच्या खात्यातून ५१ हजार ४०० रुपये काढून घेत फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दत्तात्रय शिवय्या चिलवेरी ( वय ६४, रा. वारद चाळ, मुरारजी पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरावर गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी चिलवेरी ट्रेझरी शाखेच्या एटीएम सेंटर मधून पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांना पैसे काढता न आल्याने त्यांनी शेजारी थांबलेल्या दोन इसमांना मदत मागितली. त्यावेळी त्यांनी तुमच्या खात्यात पैसे नाहीत, असे म्हणत त्यांना पाठवून दिले. त्यावेळी त्यांचे एटीएम कार्डही त्या इसमांनी बदलले. दरम्यान, चिलवेरी यांच्या खात्यातील ५१ हजार ४०० रुपये काढण्यात आल्याचा संदेश त्यांना आला. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.