शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

जातपडताळणीसाठी सोलापुरात ३0 हजारांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 10:25 IST

जिल्हा नियोजन सभेत गोंधळ; जिल्हाधिकारी म्हणाले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्याचे केले आवाहन

ठळक मुद्दे- सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विविध विषयावर चर्चा- शिक्षण विभाग, जातपडताळणी विभागांच्या तक्रारीत झाली वाढ- जिल्हाधिकाºयांनी दिले विविध विभागाच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : जातपडताळणी प्रमाणपत्रासाठी ३0 हजारांची मागणी केली जाते असा आरोप सदस्याने केल्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या सभेत गुरुवारी गोंधळ उडाला. 

सुभाष माने यांनी जानेवारीच्या सभेत जातपडताळणी कार्यालयाकडे विद्यार्थ्यांची प्रकरणे प्रलंबित असल्याने प्रवेशाला अडचण येत असल्याची तक्रार केली होती. या प्रश्नांकडे लक्ष वेधताना माने यांनी आज जातपडताळणी कार्यालयात प्रमाणपत्र देण्यासाठी ३0 हजारांची मागणी केली जाते, याचे माझ्याकडे पुरावे आहेत असा आरोप केला. यामुळे सर्व सदस्य अवाक् झाले. ही वस्तुस्थिती असल्याचे आनंद चंदनशिवे, उमेश पाटील यांनी निदर्शनाला आणले.

सहपालकमंत्री तानाजी सावंत यांनी जात पडताळणीचे जबाबदार अधिकारी कोण आहेत असा सवाल केला. याच दरम्यान जातपडताळणी विभागाच्या सचिव शोभा दराडे धावतच सभागृहात आल्या. एका प्रकरणाची सुनावणी असल्याने उशिरा आल्याचे कारण सांगून त्यांनी निवडणुकीसाठी आलेल्या सर्व प्रकरणांचा निपटारा केल्याचे स्पष्ट केले. प्रश्न विद्यार्थ्यांचा आहे, ही प्रकरणे किती प्रलंबित आहेत असा सवाल सावंत यांनी केला.जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी तक्रारी वाढल्याने मी स्वत: जातपडताळणी कार्यालयास भेट दिली होती. तेथील कर्मचारी पैशाची मागणी करीत असतील तर संबंधितांनी लाचलुचपतकडे संपर्क साधावा असा खुलासा केला. आमदार बबनदादा शिंदे यांनी नदीकाठचा वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली. 

प्रणिती शिंदे अनुपस्थित

  • - जिल्हा नियोजन सभेला आमदार प्रणिती शिंदे यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. मागील नियोजन बैठकीच्यावेळी केलेल्या आंदोलनप्रकरणात न्यायालयाने वॉरंट काढल्याने त्या आल्या नसाव्यात अशी सभास्थानी सदस्यांमध्ये चर्चा सुरू होती. 
  • - घाटणे बॅरेजमध्ये पाणी अडविणे व सीना भोगावती जोडकालव्याचे काम करण्यात यावे अशी मागणी उमेश पाटील यांनी केली. त्यावर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी हे काम होण्यासाठी  सर्वेक्षण करण्यासाठी तरतूद करू असे सांगितले.
टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग