शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

घरकूलसाठी ५ हजार ०३४ लाभार्थ्यांना मिळणार २० हजार ब्रास मोफत वाळू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 14:23 IST

सोलापूरच्या जिल्हाधिकाºयांनी दिले तहसिलदारांना आदेश; वाहतुकीचा खर्च मात्र लाभार्थ्यांना करावा लागणार

ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांनी दिलेले आदेश निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनिलकुमार नवाळे यांच्याकडे दिलेप्रधानमंत्री, रमाई, शबरी पारधी आवास योजनेतील जिल्ह्यातील ५९५ गावातील ५०३४ लाभार्थ्यांना २० हजार ५८३ ब्रास वाळू वाटपाचे पास वितरित करण्यात येत आहेत

सोलापूर : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत जिल्ह्यात बांधण्यात येणाºया घरकूल योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच ब्रास मोफत वाळू पुरवठा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी संबंधित तहसीलदारांना दिले आहेत. जिल्हाधिकाºयांनी दिलेले आदेश निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनिलकुमार नवाळे यांच्याकडे दिले आहेत. त्याप्रमाणे प्रधानमंत्री, रमाई, शबरी पारधी आवास योजनेतील जिल्ह्यातील ५९५ गावातील ५०३४ लाभार्थ्यांना २० हजार ५८३ ब्रास वाळू वाटपाचे पास वितरित करण्यात येत आहेत. 

अक्कलकोट तालुक्यात तडवळ येथे महसूल विभागाने चोरटी वाहतूक करणारी ६०० ब्रास वाळू जप्त केली होती. ही वाळू २१५ लाभार्थ्यांना तहसीलदार अंजली मरोड, गटविकास अधिकारी महादेव कोळी, सहायक महादेव बेळ्ळे यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आली. गटविकास अधिकारी कोळी यांनी वाहनांची उपलब्धता करीत लाभार्थ्यांच्या घरापर्यंत ही वाळू पोहोच केली. यामुळे अक्कलकोटमधील घरकूल बांधणीच्या कामाला वेग येणार आहे. 

उत्तर सोलापूर तालुक्यात ४३८ लाभार्थी आहेत. याठिकाणी २०१९ ब्रासची मागणी आहे. त्याअनुषंगाने तहसीलदार जयवंत पाटील व गटविकास अधिकारी रंजना कांबळे यांनी लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करण्याची यंत्रणा लावली आहे. उत्तर पंचायत समितीतील कनिष्ठ सहायक जे. आर. अन्सारी व संबंधित गावच्या ग्रामसेवकांवर लवंगी येथून वाळू उपलब्ध करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. याचबरोबर मोहोळ, मंगळवेढा, सांगोला, माढा, माळशिरस, बार्शी, करमाळा, पंढरपूर, दक्षिण तहसीलदारांना वाळू उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

घरकूल लाभार्थीजिल्ह्यातील घरकूल लाभार्थ्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. गावे: ५९५, प्रधानमंत्री आवास योजना: १२६४, आवास योजना: ३७४२, शबरी आवास: १६, पारधी आवास: १२, एकूण घरकूल लाभार्थी: ५०३४. प्रत्येक लाभार्थी पाच ब्रासप्रमाणे एकूण वाळूची मागणी: २०५८३ ब्रास. घरकूल लाभार्थ्यांच्या नावे पाच ब्रास वाळू मोफतचा पास ग्रामसेवक, तहसीलमधील कनिष्ठ सहायकामार्फत उपलब्ध केला जातो. लाभार्थ्यांनी वाळू साठ्यातून स्वत:च्या खर्चाने वाहतूक करायची आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयPradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजनाHome Ministryगृह मंत्रालय