चौथीत शिकणाऱ्या बालिकेवर अत्याचार; मुलाविरुद्ध गुन्हा

By विलास जळकोटकर | Updated: November 18, 2023 18:04 IST2023-11-18T18:02:35+5:302023-11-18T18:04:14+5:30

सोलापूर : शेजारच्या घरी आलेल्या मुलानं जबरदस्तीने चौथीत शिकणाऱ्या बालिकेवर अत्याचार करण्याचा धक्कादायक प्रकार शहरातील एका परिसरात शुक्रवारच्या सायंकाळी ...

4th class girl assaulted; Crime against child in solapur | चौथीत शिकणाऱ्या बालिकेवर अत्याचार; मुलाविरुद्ध गुन्हा

चौथीत शिकणाऱ्या बालिकेवर अत्याचार; मुलाविरुद्ध गुन्हा

सोलापूर : शेजारच्या घरी आलेल्या मुलानं जबरदस्तीने चौथीत शिकणाऱ्या बालिकेवर अत्याचार करण्याचा धक्कादायक प्रकार शहरातील एका परिसरात शुक्रवारच्या सायंकाळी घडला. या प्रकाराची माहिती मिळताच पिडितेच्या आईने शनिवारी सदर बझार पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद नोंदविली. पोलिसांनी संबंधित मुलाविरुद्ध भा. द. वि. ३७६, लैंगिक छळप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.

यातील पीडितेची आई आपल्या दोन मुले व एक मुलगी असे चौघे शिलाईचं काम करुन उपजीविका भागवतात. चार वर्षांपूर्वी पिडितेच्या वडिलांचे निधन झाले आहे. शनिवारी पिडित बालिका चार ते पाचच्या दरम्यान घराजवळच्या मैत्रिणीकडे खेळायला जाते म्हणून गेली. बराच वेळ ती आली नाही म्हणून आई मुलीच्या मैत्रिणीकडे गेली असता ती तेथे नव्हती.

सायंकाळी मुलगी परत आली. ती रडवलेली झाली होती. तिला विचारणा केली असता घरापासून काही अंतरावर असलेल्या शेजाऱ्याच्या घरी आलेल्या एका मुलानं दुष्कृत्य केल्याचे तिने सांगितले. त्या मुलाचा शोध घेऊन त्याला पोलीस ठाण्याला नेऊन तक्रार नोंदविली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, तपास फौजदार डोंगरे करीत आहेत.

Web Title: 4th class girl assaulted; Crime against child in solapur