पाणी पिण्यासाठी जाताना वाटेत चक्कर येऊन पडल्यानं ४९ वर्षीय गृहस्थाचा मृत्यू
By विलास जळकोटकर | Updated: January 2, 2024 17:53 IST2024-01-02T17:52:09+5:302024-01-02T17:53:07+5:30
चक्कर येऊन पडल्यानं रक्ताची उलटी होऊन त्यांचा वाटेतच मृत्यू.

पाणी पिण्यासाठी जाताना वाटेत चक्कर येऊन पडल्यानं ४९ वर्षीय गृहस्थाचा मृत्यू
विलास जळकोटकर, सोलापूर : तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी किचनमध्ये जाताना चक्कर येऊन पडल्यानं रक्ताची उलटी होऊन एका ४९ वर्षीय गृहस्थाचा दवाखान्यात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी ६:३० च्या सुमारास भवानी पेठ, नामदेव नगर येथे ही दुर्दैवी घटना घडली. जनार्दन एकनाथ भडंगे (वय- ४९, रा. भवानी पेठ, नामदेव नगर, सोलापूर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
यातील मयत जनार्दन हे मंगळवारी सकाळी ६:३० च्या सुमारास तहान लागल्यानं किचनमध्ये पोहताना चक्कर आल्यानं त्यांचा तोल गेला आणि ते खाली कोसळले. त्यांच्या कानातून रक्त येऊन चेहऱ्याला जखम झाली.
रक्ताची उलटी झाल्याने घरातील सारेच घाबरले. त्यातच त्यांची शुद्ध हरपली. भाऊ उमेश भडंगे यांनी तातडीने शासकीय रुग्णालय गाठले. डॉक्टरांनी तपासणी केली मात्र त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.