नव्या दहा पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील 49 जणांच्या अहवालाची सोलापूरकरांना प्रतिक्षा

By Appasaheb.patil | Published: April 16, 2020 09:16 PM2020-04-16T21:16:45+5:302020-04-16T21:24:23+5:30

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती; सोलापुरात आतापर्यंत 12 कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची नोंद....

49 newcomers in contact with new ten positive patients await report | नव्या दहा पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील 49 जणांच्या अहवालाची सोलापूरकरांना प्रतिक्षा

नव्या दहा पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील 49 जणांच्या अहवालाची सोलापूरकरांना प्रतिक्षा

googlenewsNext
ठळक मुद्देमहिलेच्या संपर्कातील 22 जणांचे स्वॅब घेण्यात आले, यातील 12 जणांचे निगेटिव्ह तर 9 जणांचे पॉझिटिव्ह148 अहवाल प्राप्त झाले आहेत. 146 निगेटिव्ह तर 2 पॉझिटिव्ह अहवाल

सोलापूर : आत्तापर्यंत सोलापुरात कोरोना बाधित 12 रुग्ण आढळून आले होते; यात 1 मृत्यू तर 11 जणांवर उपचार सुरू आहेत. आज सायंकाळी मिळालेल्या वैद्यकीय अहवालानुसार बाधितांच्या संख्येत कोणतीही वाढ झालेली नसल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. 

आत्तापर्यंत सोलापुरात कोरोना बाधित संशयित 474 जणांचे स्वॅब शासकीय रुग्णालयात चाचणीसाठी घेण्यात आले होते .आतापर्यंत यापैकी 460 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 448 जणांचे अहवाल निगेटिव्ह असून 12 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अद्यापही 14 जणांचे अहवाल येणे अपेक्षित आहे. 

पॉझिटिव्ह 12 पैकी 11 जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. एका रुग्णाचा आधीच मृत्यू झाला आहे. पाच्छा पेठेत मृत पावलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील 148 जणांचे कोरोना चाचणी अहवालसाठी स्वॅब घेण्यात आले होते. यातील सर्व 148 अहवाल प्राप्त झाले आहेत. 146 निगेटिव्ह तर 2 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत.

या दोन पैकी खाजगी हॉस्पिटलमधील एक महिला सेविका होती. त्यानंतर या महिलेच्या संपर्कातील 22 जणांचे स्वॅब घेण्यात आले, यातील 12 जणांचे निगेटिव्ह तर 9 जणांचे पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. अद्यापही एका व्यक्तीचा अहवाल पेंडिंग आहे.

आता या नवीन 10  पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील 49 जणांचे स्वॅब घेण्यात आले असून त्याचा अहवाल प्रतीक्षेत आहे. 

Web Title: 49 newcomers in contact with new ten positive patients await report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.