शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

मुंबईहुन निघालेल्या जोडप्यांचे चेन्नई एक्सप्रेसमधून ४० लाखांचे दागिने पळविले, सोलापूर हद्दीतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 12:28 IST

कुर्डूवाडी दरम्यानची घटना : नेल्लूरच्या प्रवाशाकडून बनवेगिरीचा प्रकार?

ठळक मुद्देटीटीईकडे तक्रार नोंदवणाºया प्रवाशाचे नाव विपुल कुमार (मु़ पो़  नेल्लूर)टीटींईकडे तक्रार नोंदवणाºया प्रवाशाने रेल्वे पोलिसांकडे तक्रारसोलापूरचे आरपीएफ पथक, गुन्हे उकल शाखेचे पथक कामाला लागले़

सोलापूर : चेन्नई एक्सप्रेसने मुंबईहून रेणुगुंटला निघालेल्या जोडप्यांचे ४० लाखांचे सोने चोरट्यांनी लांबवल्याची तक्रार संबंधित जोडप्याने टीटीईकडे केली. हा प्रकार कुर्डूवाडी-सोलापूरदरम्यान घडला़ दरम्यान  टीटींईकडे तक्रार नोंदवणाºया प्रवाशाने रेल्वे पोलिसांकडे तक्रार नोंदवताना हात आखडता घेतल्याने लोहमार्ग पोलिसांनी या चोरीबद्दल संशय व्यक्त केला आहे. त्या प्रवाशाला पोलिसांनी चौकशीसाठी हजर व्हायला सांगितले आहे़ 

टीटीईकडे तक्रार नोंदवणाºया प्रवाशाचे नाव विपुल कुमार (मु़ पो़  नेल्लूर) असून, ३१ आॅगस्ट रोजी पहाटे ३ ते ४़३० वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे़ पत्नीच्या काही वैद्यकीय तपासणी आणि उपचारासाठी विपुल हा तिला घेऊन मुंबईला गेला होता़ ३० आॅगस्ट रोजी सायंकाळी दादर-चेन्नई एक्सप्रेसने हे जोडपे रेणुगुंटला निघाले़ वाडी स्थानकावर गाडी येत असताना जवळचे सोने चोरीला गेल्याचे लक्षात आले़ या जोडप्याच्या मते हे सोने कुर्डूवाडी-सोलापूरदरम्यान चोरीस गेले आहे़ त्यांनी लागलीच वाडी रेल्वे स्थानकावर टीटीई गाठून याबाबत तक्र ार दिली़

दिवसभर सीसीटीव्ही फुटेज तपासलेविपुल कुमार याने तक्रार दिल्यानंतर टीटीईने ती आरपीएफ पोलिसांकडे पाठवली़ सोलापूरचे आरपीएफ पथक, गुन्हे उकल शाखेचे पथक कामाला लागले़ दिवसभर अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले़ रेकॉर्डवरच्या अनेकांची चौकशी झाली़ परंतु तपासात खरोखरच सोने पळविल्याचा धागा सापडेना़ अखेर आरपीएफ आणि लोहमार्गच्या पोलिसांनी नेल्लूर येथे विपुलचे घर गाठून त्याच्या कुटुंबाकडे चौकशी केली़ चौकशीत हा प्रकार खोटा असल्याची माहिती पुढे येत आहे़

कुटुंबाकडे चौकशी करताना तो घरी नव्हता़ तपासात या दागिन्यांची पावती नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले़ इतके दागिने कधी आणि कुठून खरेदी केले? याबाबतही उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे सूत्रांनी सांगितले़ त्यामुळे चेन्नई एक्सप्रेसमधील कुर्डूवाडी-सोलापूरदरम्यानचा घडलेला प्रकार म्हणजे बनवेगिरी असल्याचे वर्तविले जात आहे़

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसrailwayरेल्वेtheftचोरीPoliceपोलिस