380 animals swept away in floods; 15,000 hens go missing | Solapur Flood; महापुरात वाहून गेली ३८० जनावरे; १५ हजार कोंबड्या बेपत्ता

Solapur Flood; महापुरात वाहून गेली ३८० जनावरे; १५ हजार कोंबड्या बेपत्ता

सोलापूर: जिल्ह्यात सीना, भीमा, बोरी, भोगावती नदीला आलेल्या पुरात ३८० जनावरे वाहून गेली, त्यात एका घोड्याचाही समावेश आहे. तसेच १४ हजार १७१ कोंबड्या बेपत्ता झाल्या आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी नवनाथ नरळे यांनी दिली.

जिल्ह्यात १३ आॅक्टोबरपासून वादळी वाºयासह झालेला पाऊस आणि त्यानंतर नद्यांना आलेल्या महापुराचा तडाखा जसा शेतीला बसला तसा जनावरांनाही बसला आहे. यामध्ये ११ तालुक्यातील ८४ गावांमधील जनावरे वाहून गेली तर काही जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. यामध्ये गाई:१२९, बैल:८, वासरे: ४१, म्हैस: ४६, रेडके: ११, शेळ्या: १४४, करडे: ११, घोडा:१ आणि कोंबड्या: १४ हजार १७१ अशी संख्या आहे. बार्शी तालुक्यातील कोरेगाव येथील एका शेतकºयाचा घोडा, महाळुंग येथील २५00,होटगी: १000, शिरशी: ९00, कदमवाडी: १00, शेंडचिंच: १५, उंबरे दहिगाव : १४0, पळस:१४0, बांगडे:२0, डिकसळ:१५0, कामती:४0, साबळेवाडी:४0,नरखेड:१३१, सुस्ते:२0 आणि गुरसाळेतील १५ कोंबड्या बेपत्ता आहेत.

वीज पडून मेलेल्या जनावरांचे पंचनामे करण्यात आले आहेत. वाहून गेलेल्या जनावरांची माहिती तलाठी, सरपंच, पोलीस पाटील यांच्या मदतीने संकलित करण्यात आली आहे. जनावरांची संख्या मोठी असली तरी किंमत ठरलेली नाही. प्रत्येक जनावरांची बाजारभावाप्रमाणे व त्यांच्या वयोमानाप्रमाणे किंमत असते. त्यामुळे महसूल विभाग कोणत्या जनावराला किती भरपाई द्यायची याबाबत निर्णय घेत असल्याने फक्त आकडेवारी कळविल्याचे नरळे यांनी स्पष्ट केले.

लसीकरणासाठी पथके
पूरबाधित गावात असलेल्या जनावरांना न्यूमोनिया, लाळखुरकत आणि घटसर्प साथीचा धोका आहे. त्यामुळे या गावांमध्ये तातडीने पथके पाठविण्यात आली आहेत. १ लाख १0 जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे.

Web Title: 380 animals swept away in floods; 15,000 hens go missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.