शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

सोलापूरातील पाणीपुरवठ्यासाठी ३७२ कोटींच्या कामांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 1:15 PM

स्मार्ट सिटी कंपनी : संचालक मंडळाच्या बैठकीत ६६३ कोटींच्या कामांना मंजुरी

ठळक मुद्देशहरात एलईडी दिवे बसविण्याचा प्रस्तावअ‍ॅडव्हेंचर पार्कसाठी ४ कोटी ३४ लाखांचा खर्च येणारस्मार्ट सिटी एरियात २४ तासऐवजी दररोज पाणीपुरवठा करण्याचे नियोजन

सोलापूर : सोलापूूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीच्या बैठकीत ३७२ कोटींच्या विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली. त्यात एनटीपीसीच्या निधीतून साकारण्यात येणाºया जलवाहिनीसाठी २00 कोटी तर स्मार्ट सिटी एरियात दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिन्या बदलण्यासाठी १७२ कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली. 

सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीचे चेअरमन असिम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची तेरावी बैठक शासकीय विश्रामधाम येथे झाली. या बैठकीला कंपनीचे संचालक महापौर शोभा बनशेट्टी, सभागृहनेते संजय कोळी, विरोधी पक्षनेते महेश कोठे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, नरेंद्र काटीकर, चंद्रशेखर पाटील, नगरअभियंता संदीप कारंजे, नगररचनाचे सहायक संचालक लक्ष्मण चलवादी, सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे, सल्लागार आनंद गावडे, राहुल कुलकर्णी, मनीष कुलकर्णी, तपन डंके उपस्थित होते. 

प्रारंभी कंपनीचे सीईओ तथा महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्मार्ट सिटी कंपनीतर्फे सुरू असलेल्या कामाबाबत माहिती दिली. घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी ५ कोटी खर्चून ९0 घंटागाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. चार ट्रान्स्फर स्टेशन, २0 मेट्रिक टन हुक लोडर, २५ टन जेबीडब्लू वाहन खरेदीसाठी ३ कोटी २३ लाख खर्च करण्यात येणार आहे. ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी मिळकतदारांना डस्टबीन देण्यात येत आहेत. यासाठी ९८ लाख खर्च आला आहे.

शहरात एलईडी दिवे बसविण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी ३७ कोटींची तरतूद आहे. हुतात्मा बाग व पासपोर्ट कार्यालयाजवळ हरितक्षेत्र निर्माण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अ‍ॅडव्हेंचर पार्कसाठी ४ कोटी ३४ लाखांचा खर्च येणार असून डिसेंबरअखेर हे काम पूर्ण होईल. होम मैदान सुधारण्याचे काम हाती घेण्यात आले असून, त्यासाठी २ कोटी ४४ लाख इतका खर्च येणार आॅक्टोबरअखेर हे काम पूर्ण होईल. यावेळी सभागृहनेते कोळी यांनी ऐतिहासिक हुतात्मा स्तंभाचे सुशोभीकरण करून सोलापूरचा इतिहास चित्ररूपाने रेखाटण्याचा कामाचा प्रस्ताव मांडला. असे आणखी कोणास नवीन प्रस्ताव द्यायचे असतील त्यांनी २ आॅक्टोबरच्या आत द्यावेत अशी सूचना चेअरमन गुप्ता यांनी केली. 

समांतर जलवाहिनीचे टेंडर निघणारस्मार्ट सिटीमध्ये सर्वात जास्त पाणीपुरवठ्याला महत्त्व दिले गेले आहे असे चेअरमन गुप्ता यांनी सांगितले. त्यामुळे २0४५ पर्यंत सोलापूरचा पाणीपुरवठा सुरळीत राहील असे नियोजन करण्यात येत आहे. स्मार्ट सिटी एरियात २४ तासऐवजी दररोज पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी जुन्या गावठाणातील सर्व जलवाहिन्या व ड्रेनेजलाईन बदलण्यात येईल.

या कामासाठी १७२ कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली. एनटीपीसीच्या निधीतून ४३९ कोटींची समांतर जलवाहिनीचे काम साकारण्यासाठी स्मार्ट सिटीतून २00 कोटी निधी देण्यास मंजुरी देण्यात आली. आॅगस्टअखेर या कामांचे टेंडर काढण्याबाबत चेअरमन गुप्ता यांनी सूचना दिल्या. अमृत योजनेतून ३00 कोटी निधी मिळणार आहे. यात महापालिकेचा हिस्सा ७५ कोटी राहणार आहे. या योजनेतून हद्दवाढ भागातील योजना सुधारण्यात येतील.  

सात रस्ता चौकासाठी ८ कोटीसात रस्ता चौकाचे महत्त्व लक्षात घेऊन या ठिकाणी पीपीटी मॉडेलवर भुयारी बझार विकसित करण्यासाठी ४0 कोटी खर्च येणार आहे. यासाठी स्मार्ट सिटीतून ८ कोटींची तरतूद करण्यात आली. महापालिका परिवहनच्या सातरस्ता बसडेपोेचा विकास करून व्यावसायिक संकुल बांधण्यासाठी २0 कोटींची तरतूद करण्यात आली.

हुतात्मा सभागृहाचे नूतनीकरणास ५ कोटींची तरतूद करण्यास मंजुरी देण्यात आली. शहरात स्मार्ट पार्किंग उभे करण्यासाठी अडीच कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या मागील बाजूस कमांड अ‍ॅन्ड कंट्रोल सेंटर उभारणे, शासकीय इमारतीवर सोलर बसविणे, पार्क स्टेडियममध्ये सुधारणा,  सिद्धेश्वर तलाव विकसित करण्याच्या कामांना गती देण्यावर चर्चा झाली. यासाठी पुरातत्त्व खात्याकडून आवश्यक त्या परवान्याबाबत पाठपुरावा करण्याबाबत सूचना दिल्या. 

१३ रस्त्यांच्या कामांना मंजुरीलक्ष्मी मार्केटच्या नूतनीकरणासाठी साडेआठ कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. याचबरोबर २४ कोटींच्या भैय्या चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सिद्धेश्वर मंदिर ते पंचकट्टा, विजापूर वेस ते कोंतम चौक, विजापूर वेस, बारा ईमाम, भारतीय चौक ते रंगा चौक, सरस्वती, लकी ते दत्त चौक, छत्रपती शिवाजी चौक, बाळीवेस, टिळक चौक, मधला मारुती, कोंतम, कन्ना चौक ते भुलाभाई चौक, दिलखुश हॉटेल ते चौपाड बालाजी मंदिर, बाळीवेस, मल्लिकार्जुन मंदिर, पंजाब तालीम ते चौपाड, दत्त चौक, लक्ष्मी मार्केट, पंचकट्टा ते पूनम गेट, लक्ष्मी मार्केट ते विजापूर वेस, भारतीय चौक, एमआयडीसी रोड, रेल्वे हॉस्पिटल, बक्षी बिल्डिंग ते गुडलक स्टोअर, फडकुले सभागृह ते मंगळवेढेकर कॉलेज, एलआयसी कॉर्नर ते सेंट जोसेफ शाळा, प्रिन्स हॉटेल ते रेल्वे मैदान, शुभराय गॅलरी, कोनापुरे चाळ, पटवर्धन चौक या कामांना मंजुरी देण्यात आली. हे रस्ते करताना पाणी, ड्रेनेज, विजेच्या वायरी आणि चौक सुशोभीकरण ही कामे एकत्रित केली जातील. कामासाठी दीडपट जादा निधी दिल्याने रस्त्यांची गुणवत्ता राखण्यावर भर दिला जाईल असे चेअरमन गुप्ता यांनी सांगितले. 

सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या बैठकीत १४ प्रकल्पांवर चर्चा करून आवश्यक त्या मंजुरी दिल्या आहेत. पाणी हा महत्त्वाचा प्रश्न असून, समांतर जलवाहिनीसह इतर महत्त्वाच्या कामांना निधी मंजूर केला असून, लवकरच टेंडर निघतील. स्मार्ट सिटीच्या कामाची प्रगती दिसत असल्याने समाधान आहे.- असिम गुप्ता, चेअरमन, सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कंपनी

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाWaterपाणी