शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

उजनी धरणात ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 13:01 IST

सोलापूर : उजनी धरणात शिल्लक असलेला पाण्याचा साठा लक्षात घेता रब्बी हंगामासाठी कालव्याला पाणी सोडण्याबाबतचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या ...

ठळक मुद्देकालवा सल्लागार समितीच्या बैठकीत उजनी धरणातील पाणी वापराचे नियोजन केले जातेरब्बी हंगामासाठीच्या पाणी पाळीचे नियोजन करण्यात आले होते. २० जानेवारीपासून कालव्यातून पाणी सोडण्याच्या झालेल्या निर्णयाप्रमाणे पाणी सोडले जाणार नसल्याचे सांगण्यात आले.

सोलापूर: उजनी धरणात शिल्लक असलेला पाण्याचा साठा लक्षात घेता रब्बी हंगामासाठी कालव्याला पाणी सोडण्याबाबतचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात येणार आहे. यापूर्वी २० जानेवारीपासून कालव्यातून पाणी सोडण्याच्या झालेल्या निर्णयाप्रमाणे पाणी सोडले जाणार नसल्याचे सांगण्यात आले.

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत उजनी धरणातील पाणी वापराचे नियोजन केले जाते. कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रब्बी हंगामासाठीच्या पाणी पाळीचे नियोजन करण्यात आले होते. 

कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार रब्बीसाठी दुसºया पाळीतील पाणी २० जानेवारीपासून सोडण्यात येणार होते. मात्र २० जानेवारीपासून कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले. शुक्रवारी उजनी धरणात ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. सोलापूर शहरासाठी भीमा नदीला पाणी सोडण्यात आले असून औज-चिंचपूर बंधाºयापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी व आवश्यक पाणीसाठा होईपर्यंत धरणातील पाणी साठा ३० टक्क्यांवर येईल असे अधिकाºयांनी सांगितले. उजनी धरणातील सध्याची पाणी पातळी व पुढील उन्हाळा लक्षात घेऊन रब्बी हंगामासाठी २० जानेवारीपासून कालव्यातून पाणी सोडण्याऐवजी २० फेब्रुवारी दरम्यान सोडण्याचा प्रस्ताव उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयाचा आहे. त्यासाठी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मान्यता मिळणे आवश्यक आहे. कालवा सल्लागार समितीच्या मंजुरीशिवाय कालव्यातून पाणी सोडता येत नसल्याने लवकर बैठक घेण्यासाठी जलसंपदा मंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. 

धरणात १९ टीएमसी पाणीउजनी धरणात सध्या ८२.५१ टीएमसी असून यामध्ये मृतसाठा ६३.६६ टीएमसी आहे. १८.८५ टीएमसी पाणी उपयुक्त आहे. धरणाच्या पाण्यावर अधिकाधिक ऊस क्षेत्र अवलंबून आहे व कारखान्यासाठी ऊस तोडणी सुरू असल्याने सध्या शेतकºयांकडून पाण्याची मागणीही नाही. यामुळे रब्बी व उन्हाळी अशा एकाचवेळी फेब्रुवारी महिन्यात पाणी सोडण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले.

पाण्याची शेतकºयांकडून मागणी नाही. धरणात पाणीसाठा लक्षात घेऊन रब्बी व उन्हाळी असे एकाचवेळी पाणी सोडण्याचे नियोजन आहे. यासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक घेण्यासाठी पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू आहे.- धीरज साळेअधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण 

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणWaterपाणीGirish Mahajanगिरीश महाजनPuneपुणे