Good News; सोलापूर जिल्ह्यातील ३३ रुग्णांनी केली ‘कोरोना’वर मात...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 16:36 IST2020-06-09T16:33:47+5:302020-06-09T16:36:22+5:30
मंगळवारी ८७ अहवाल निगेटिव्ह; फक्त ४३ कोरोना बाधितांवर उपचार सुरू

Good News; सोलापूर जिल्ह्यातील ३३ रुग्णांनी केली ‘कोरोना’वर मात...!
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात (महानगरपालिका हद्द वगळून) कोरोनाग्रस्तांची संख्या हळूहळू कमी कमी होत चालली आहे. आतापर्यंत ३३ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार ८७ पैकी ८७ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आता फक्त ४३ रूग्णांवर कोरोना वॉर्डात उपचार करण्यात येत असल्याचे प्रशासनाने सांगितले.
सोलापूर जिल्ह्यात (महानगरपालिका हद्द वगळून) आतापर्यंत १ हजार ६८४ रूग्णांची कोरोना टेस्ट करण्यात आली, त्यापैकी १ हजार ६५३ अहवाल प्राप्त झाले, यातील १ हजार ५७२ अहवाल निगेटिव्ह तर ८१ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मंगळवारी ८७ जणांचे अहवाल प्राप्त झाले त्यापैकी सर्वच निगेटिव्ह आले. आजपर्यंत ग्रामीण भागात ६ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून ३३ रूग्ण बरे होऊन घरी परतले असल्याचे प्रशासनाने सांगितले.