शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

सोलापूर जिल्हा बँकेवर ३०० कोटींचा बोजा, चेअरमन राजन पाटील यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 1:26 PM

जिल्हा बँकेचा कारभार सध्या प्रशासकाच्या माध्यमातून सुरू आहे

ठळक मुद्देखरीप हंगामासाठी अवघे ४५  कोटी कर्ज वाटप२७४ कोटी रूपयांच्या ठेवींवर ६० कोटी रूपयांचा ओव्हर ड्राफ्टपीक कर्ज वाटप १८० कोटीपर्यंत केले

सोलापुर:  सोलापूर जिल्हा सहकारी बँकेने राज्य बँकेतील २७४ कोटी रूपयांच्या ठेवींवर ६० कोटी रूपयांचा ओव्हर ड्राफ्ट काढल्याने जिल्हा बँकेच्या बाहेरील कर्जाचा बोजा आता ३०० कोटी रूपयांचा झाला आहे. संचालक मंडळाच्या कालावधीत बँकेवर २४० कोटी रूपयांचे बाहेरील कर्ज होते अशी माहिती बँकेचे चेअरमन माजी आमदार राजन पाटील यांनी दिली.

जिल्हा बँकेचा कारभार सध्या प्रशासकाच्या माध्यमातून सुरू आहे; पण कर्जामध्ये मागील तीन महिन्यात कर्जामध्ये सातत्याने वाढच होत आहे. बँकेकडून राज्य बँकेतील ठेवीही मोडल्या जात आहेत. २९९ कोटी रूपयांच्या एकूण ठेवींपैकी २५ कोटी रूपयांच्या ठेवींची मुदत संपलेली असताना ती रक्कमही बँकेने काढून इतरत्र वळविण्यात आल्याचेही राजन पाटील यांनी सांगितले.

 संचालक मंडळाच्या कालावधीत खरीप हंगामासाठी अवघे ४५  कोटी कर्ज वाटप झाले होते. प्रशासक अविनाश देशमुख यांनी पीक कर्ज वाटप १८० कोटीपर्यंत केले; पण त्याचवेळी  बाहेरील कर्जाचा बोजा ३०० कोटी रूपयांपर्यंत वाढला. बॅक बरखास्तीच्या निर्णयाला संचालकांनी दिलेल्या उच्च न्यायालयातील आव्हान याचिकेत कर्ज वाटपालाही हरकत घेण्यात आली आहे. कर्ज वाटप धोरणात्मक निर्णय असल्याने नव्याने कर्ज वाटपालाही न्यायालयाने मनाई केली आहे. या स्थितीत राज्य बॅकेतील मुदत संपलेल्या २५ कोटी रूपयांच्या ठेवी काढून घेतल्या आहेत आणि ६० ओव्हर ड्राफ्ट काढला आहे. यामुळेच कर्जाचा बोजा वाढत असल्याचे राजन पाटील यांनी सांगितले़ 

टॅग्स :SolapurसोलापूरbankबँकBanking Sectorबँकिंग क्षेत्रSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय