महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्रासाठी शासनाकडून तीन कोटी निधी मंजूर
By बाळकृष्ण दोड्डी | Updated: March 8, 2023 14:43 IST2023-03-08T14:34:31+5:302023-03-08T14:43:42+5:30
या निधीमुळे बसव प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे

महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्रासाठी शासनाकडून तीन कोटी निधी मंजूर
बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूरविद्यापीठातील महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्रासाठी राज्य सरकारने तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करून वितरित केला आहे. त्यातून बसवतत्व आणि बसव वचन साहित्याचा व्यापक प्रचार होणार आहे, अशी माहिती विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या निधीमुळे बसव प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समितीचे अध्यक्ष डॉ. बसवराज बगले यांनी विद्यापीठातील अध्यासन विभागास भेट देऊन केंद्राच्या उपक्रमाची माहिती घेतली. समाजातील विविध संघटनांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्रचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला. त्यानुसार २०१९ साली या विद्यापीठात महात्मा बसवेश्वर अध्यासन शासनाने मंजुरी दिली. तत्कालीन उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निधीसाठी कुलगुरूंनी प्रस्ताव पाठवला होता. शासनाने दिलेल्या या निधीच्या ठेवींच्या व्याजातून मिळणारी रक्कम महात्मा बसवेश्वरांचे वचन साहित्य, बसव विचारांचा प्रचार, शालेय अभ्यासक्रमातील सहभाग, प्रशिक्षण कार्यक्रम, सल्ला समुपदेशन, बसव साहित्यिकांच्या अभ्यासासाठी एमपीएल आणि पीएचडीचे प्रबंध लेखन असे विविध साहित्यिक उपक्रम राबवून बसवचरित्राचा प्रचार होणार आहे.