शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

स्पेअर पार्ट, फार्मा अन् परफ्यूमसाठी लागणारा २८ ट्रक माल सोलापुरात

By appasaheb.patil | Updated: September 3, 2020 11:36 IST

खासगी सेवा : बंगळुरु ते सोलापूर रो-रो ची देशातील पहिली रेल्वे सेवा सुरू

ठळक मुद्देसोलापूर शहरासोबत जिल्ह्यातून साधारण: २०० ते ४०० ट्रक भरून कांदा, डाळिंब, सोयाबीनसह अन्य माल बंगळुरुला जातोरो-रो ट्रेनमुळे ट्रकची झीज थांबेल, डिझेल वाचेल, टोलनाक्यावर जाणारी रक्कम वाचणारया गाडीला दोन ठिकाणी पाच-पाच मिनिटाचा थांबा आहे, अवघ्या १५ तासात ही ट्रेन बंगळुरुला पोहोचणार

सोलापूर : देशातील पहिल्या रो-रो सर्व्हिस ट्रेनची नेलमंगला ते सोलापूर (बाळे) स्थानकादरम्यान सुरुवात झाली़ दरम्यान, १५ तासांचा प्रवास करून ही २८ ट्रक मालाने भरलेली ट्रेन बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास सोलापुरातील बाळे रेल्वे स्थानकावर दाखल झाली़ बंगळुरुहून प्रामुख्याने स्पेअर पार्ट, फार्मा, अगरबत्ती, परफ्यूम इंडस्ट्रीजसाठी लागणारा माल सोलापुरात आणला आहे.

दरम्यान, प्रवासी, मालवाहतूक, पार्सल गाडी, किसान रेलनंतर सोलापुरातील उद्योजक, शेतकरी, व्यापाºयांना दिलासादायक ठरणारी देशातील पहिली खासगी रो-रो ट्रेन सुरू झाली़ मंगळवारी दुपारी १़३० वाजता निघालेली ही ट्रेन २८ ट्रक माल घेऊन बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सोलापुरात दाखल झाली.

३० टक्के होतोय फायदा...सोलापूर शहरासोबत जिल्ह्यातून साधारण: २०० ते ४०० ट्रक भरून कांदा, डाळिंब, सोयाबीनसह अन्य माल बंगळुरुला जातो़ रो-रो ट्रेनमुळे ट्रकची झीज थांबेल, डिझेल वाचेल, टोलनाक्यावर जाणारी रक्कम वाचणार आहे़ या गाडीला दोन ठिकाणी पाच-पाच मिनिटाचा थांबा आहे़ अवघ्या १५ तासात ही ट्रेन बंगळुरुला पोहोचणार आहे़ ट्रकने ने-आण करण्यापेक्षा रो-रोने हा माल बंगळुरुला पोहोच केल्यास संबंधित शेतकरी व उद्योजकांची ३० टक्के आर्थिक बचत होणार असल्याची माहिती उदयशंकर पाटील यांनी सांगितली.

सोलापूरहून शुक्रवारी रवाना होणार ट्रेनबंगळुरुहून माल घेऊन आलेली रो रो ट्रेन ही सध्या सोलापुरातील बाळे रेल्वे स्थानकावर उभी करण्यात आली आहे़ शुक्रवार ७ सप्टेंबर रोजी दुपारी दोन ते तीनच्या सुमारास डाळिंब, कांदा, तूरदाळ आणि अन्य शेतीमालाने भरलेली ४८ ट्रकची रो रो ट्रेन बंगळुरुकडे रवाना होणार आहे़ 

टॅग्स :Solapurसोलापूरcentral railwayमध्य रेल्वेbusinessव्यवसाय