शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निकल महाविद्यालयातील २५ विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 21:34 IST

Poisoning Case : बाधित सर्व चौदा विद्यार्थिनी श्री सिध्देश्वर गर्ल्स हॉस्टेल येथे वास्तव्यास होत्या.

सोलापूर :  येथील  श्री सिध्देश्वर देवस्थान संचलित वुमन्स पॉलिटेक्निक, वुमन्स इंजिनिअरिंग कॉलेज आणि फिजिओथेरपी कॉलेज येथील चौदा विद्यार्थिनींना अन्न किंवा पाण्यातून बाधा झाल्याने या सर्व विद्यार्थिनींवर इस्पितळात उपचार चालू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

बाधित सर्व चौदा विद्यार्थिनी श्री सिध्देश्वर गर्ल्स हॉस्टेल येथे वास्तव्यास होत्या. त्यांना भोजनातून किंवा पाण्यातून प्रादुर्भाव झाल्याने उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. तेव्हा त्यातील आठ विद्यार्थिनींना एस.टी. स्टँडजवळील सिध्देश्वर हॉस्पिटल येथे आणि सहा विद्यार्थिनींना भवानी पेठेतील समर्थ हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्व बाधित विद्यार्थिनींची प्रकृती पूर्ववत होत असल्याचे सांगण्यात आले. या सर्व विद्यार्थिनींवर देवस्थानच्या सर्व शिक्षण संस्थेतील प्रमुख घटक बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि त्यांच्यावर योग्य उपचाराची व्यवस्थाही करीत आहेत. त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

सदर विद्यार्थिनी आणि पालक यांना कसलाही अधिक त्रास होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. आपण स्वत: परगावी असल्याने घटनास्थळी समक्ष येऊ शकलो नाही. परंतु परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून योग्य ते निर्णय घेतले जात असल्याचे श्री सिध्देश्वर देवस्थान पंच कमिटी  आणि शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी सांगितले.

पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय पाटील इतर अधिकाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये भेट देऊन पाहणी केली आहे. सर्व विद्यार्थीनिंची विचारपूस केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Solapurसोलापूरcollegeमहाविद्यालयPoliceपोलिसStudentविद्यार्थी