शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

राज्यातील २२ दूध संघ अवसायनात; दोन दूधसंघ झाले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 2:59 PM

खासगी दूध संघांमुळे सहकार अडचणीत; गावपातळीवरील दूध पुरवठा संस्थाही कायमस्वरूपी बंद

ठळक मुद्देदूध संघापेक्षा गावपातळीवर सहकारी संस्थांची अवस्था फारच वाईट आहे राज्यात नोंदणीकृत २७ हजार ५१४ इतक्या सहकारी संस्था आहेतअनेक वर्षे बंद असल्यामुळे १२ हजार ८५० दूध संस्था अवसायनात

सोलापूर : राज्यातील सहकारी दूध उत्पादक संघ व दूध पुरवठा करणाºया सहकारी संस्था खासगी दूध संघांमुळे बंद पडत आहेत तर या बंद संस्था अवसायनात काढण्याचे काम शासकीय यंत्रणा करीत आहे. २२ जिल्हा व तालुका संघ अवसायनात निघाले तर दोन बंद आहेत. गावपातळीवरील दूध पुरवठा करणाºया १५,५०३ संस्थाही कायमस्वरुपी बंद व अवसायनात काढण्यात आल्या आहेत.

राज्यात सहकाराचे जाळे घट्ट विणल्याचे सांगितले जात होते; मात्र मागील सात-आठ वर्षांत राज्यभरात खासगी दूध संघांची संख्या वरचेवर वाढत आहे. या खासगी दूध संघांमुळे सहकारी दूध संघ वरचेवर बंद पडले आहेत. बंद असलेल्या व अवसायनात काढण्यात आलेल्या दूध संस्थांची संख्या पाहता विदारक चित्र असल्याचे दिसत आहे. राज्यात जिल्हा व तालुका पातळीवरचे ९९ सहकारी दूध उत्पादक संघ आहेत. यापैकी २१ जिल्हा संघ तसेच ५४ तालुका दूध संघ सुरू असल्याचे सांगण्यात आले. तर २२ दूध संघ अवसायनात काढण्यात आले आहेत. दोन दूध संघ बंद पडले आहेत.

दूध संघापेक्षा गावपातळीवर सहकारी संस्थांची अवस्था फारच वाईट आहे. राज्यात नोंदणीकृत २७ हजार ५१४ इतक्या सहकारी संस्था आहेत. यापैकी १२ हजार ११ दूध संस्था सुरू आहेत; मात्र यामध्येही अनेक संस्था कशाबशा सुरू आहेत. अनेक वर्षे बंद असल्यामुळे १२ हजार ८५० दूध संस्था अवसायनात काढण्यात आल्या आहेत. २,६५३ इतक्या संस्था बंद पडल्या आहेत. औरंगाबाद विभागात ५१९३, नाशिक विभागात ३७८१, अमरावती विभागात २१८७, नागपूर विभागात १२५८ तर पुणे विभागात २९५७ दूध संस्था बंद व अवसायनात काढण्यात आल्या आहेत. 

पुणे विभागही अडचणीत राज्यात पुणे विभागातील पाच जिल्ह्यात दूध संकलन प्रतिदिन ७० ते ८० लाख लिटर इतके होत आहे. या विभागातील जिल्हा व तालुका पातळीवरचे दूध संघ व गावपातळीवरील संस्था खासगी दूध संघामुळे अडचणीत येत आहेत. तालुका पातळीवरचे पाच संघ बंद आहेत तर गावपातळीवरील २९५७ दूध संस्था बंद आहेत. दूध उत्पादनात आघाडीवर असलेला पुणे विभागही खासगी दूध संघामुळे अडचणीत येत आहे.

दोन तालुका पातळीवरील दूध संघ बंद पडलेरायगड, रत्नागिरी, जालना, परभणी, वाशिम, यवतमाळ, गडचिरोली हे जिल्हा दूध संघ बंद पडल्याने अवसायनात काढले आहेत. पनवेल तालुका, भोर, कृष्णा व्हॅली, कोरेगाव,अजिंक्य, जामखेड,मालेगाव, साक्री, तळोदा, वणी, तुळजाभवानी, कन्नड, भूम, वाशी, वसंतदादा उस्मानाबाद या तालुका पातळीवरील दूध संघ अवसायनात काढण्यात आले आहेत. खामगाव व जावळी हे दोन तालुका पातळीवरील दूध संघ बंद पडले आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरMilk Supplyदूध पुरवठाagricultureशेती