शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

२०१८ विधानसभा निवडणूक कर्नाटकात जनता दल ठरणार किंगमेकर ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 15:15 IST

मामाश्री गायकवाड विजयपूर : २०१८ कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपत आला असून, यावेळी सरकार बनवण्यासाठीचे सर्व पत्ते माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या जनता दला(सेक्युलर)कडे असतील, असे चित्र आहे. काँग्रेस अथवा भाजप यापैकी कोणीही स्वबळावर सरकार स्थापन करू शकणार नाही, असे अंदाज निवडणूकपूर्व सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. साहजिकच काँग्रेस आणि भाजप या ...

ठळक मुद्देकाँग्रेस आणि भाजप या दोघांचीही मदार देवेगौडांच्या जनता दलावरकर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपत आला

मामाश्री गायकवाड विजयपूर : २०१८ कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपत आला असून, यावेळी सरकार बनवण्यासाठीचे सर्व पत्ते माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या जनता दला(सेक्युलर)कडे असतील, असे चित्र आहे. काँग्रेस अथवा भाजप यापैकी कोणीही स्वबळावर सरकार स्थापन करू शकणार नाही, असे अंदाज निवडणूकपूर्व सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. 

साहजिकच काँग्रेस आणि भाजप या दोघांचीही मदार देवेगौडांच्या जनता दलावर आहे. आम्ही स्वत:च सरकार स्थापन करू शकू, असे देवेगौडा आणि त्यांचे चिरंजीव व माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी म्हटले असले, तरी त्या दोघांशिवाय कोणालाही तसे वाटत नाही. पण गोवा, मेघालय अशा ठिकाणी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने जी तत्परता दाखवली, चपळाई दाखवली ती पाहता कर्नाटकातही त्याचीच पुनरावृत्ती करणे हा बहुमत न मिळाल्यास भाजपचा पर्याय असू शकतो. त्यामुळे धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली देवेगौडांचा राजकीय ब्लॅकमेलिंगचा धंदा बरकतीस येईल अशीही शंका व्यक्त होताना दिसते आहे. 

काँग्रेस वा भाजप यापैकी कोणाचेही अल्पमतातील सरकार आले, तर राज्याच्या राजकीय स्थैयार्साठी आम्ही नाइलाजाने त्यास पाठिंबा देत आहोत, अशी भूमिका जनता दल घेऊ शकते किंवा जनता दलालाच सरकार बनवण्याची संधी देण्यासाठी भाजपने पुढाकार घेतल्यास आश्चर्य वाटायला नको. हे भगवे राजकारण करायला देवेगौडांना काहीही वाईट वाटणार नाही. सगळी राजकीय अस्पृश्यता सोडून ते हा मार्ग स्वीकारतील. महाराष्ट्रात फडणवीस सरकार टिकावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीला त्यांच्या पाठिंब्याची भूमिका नव्हती का घेतली? तसाच काही प्रकार कर्नाटकातही घडू शकतो.

तसे पाहतात आज जनता दल (एस) म्हणजे भाजपची बी टीम आहे, असा हल्ला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रचाराच्या आरंभीच चढवला. भाजप विरोधासाठी जनता दलाला समर्थन देणा-या लोकांनी त्या पक्षाऐवजी काँग्रेसकडे वळावे, यासाठी राहुल गांधींनी केलेली ही खेळी होती. शिवाय जो पक्ष जिंकून येणारच नाही आणि जो भाजपच्या हातातील खेळणे बनणार आहे त्या पक्षामागे जाऊ नका, असा संदेश राहुल गांधी देत होते. त्यामुळे जनता दल एकदम बॅकफूटवर न जाता त्याचे महत्वच वाढत गेले. राहुल गांधींनी धर्मनिरपेक्षतेच्या नावावर जनता दलाला आपल्यासोबत घेतले असते तर सत्ता मिळवणे तसे अवघड नव्हते. पण देवेगौडांवर घसरून आणि जनता दलाला भाजपची बी टीम संबोधून ही संधी राहुल गांधींनी गमावली आणि मंदीर, मठात जाऊन दर्शन घेण्यामुळे आपल्या धर्मनिरपेक्षतेच्या कल्पनांनाही तिलांजली दिली. त्यामुळे धर्मनिरपेक्ष जनता दलाचे वजन वाढवण्याचेच काम राहुल गांधींनी केले.

मोदींची स्तुती करत देवेगौडा व कुमारस्वामी सातत्याने काँग्रेसवरच तोफ डागत होते. कर्नाटकमधील काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारने सर्वात खालची पातळी गाठली आहे. काँग्रेसने लोकायुक्त ही संस्था खालसा केली आहे, असे बरेच आरोप देवेगौडा करत आहेत. काँग्रेस व भाजप हे समान शत्रू आहेत, असे ते दाखवत असले, तरी त्यांचा काँग्रेसलाच अधिक विरोध आहे. वास्तविक धर्मनिरपेक्षता निदान नावातच असलेल्या जनता दलाने, भाजपपेक्षा काँग्रेसला समर्थन देणे हे अधिक तर्कसंगत ठरते. परंतु जनता दल भाजपबद्दल सौम्य टीका करताना दिसतो. कारण राहुल गांधींनी हे घरोब्याचे मार्ग अगोदरच बंद केलेले आहेत. देवेगौडा जेव्हा माज्या भेटीची वेळ मागतात, तेव्हा त्यांना मी ती वेळ देतो. एवढेच नव्हे, तर कापर्यंत सोडायला जातो. कारण माजी पंतप्रधान आणि वयस्क नेते म्हणून त्यांच्याबद्दल मला आदर आहे, असे उद्गार मोदी यांनी काढले. उलट राहुल गांधींनी देवेगौडांचा अपमान केला आहे, अशी टीका मोदी यांनी केली. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस यांच्या सत्तास्पर्धेत देवेगौडा आणि जनता दल आपोआप चर्चेत राहतो आहे.

कर्नाटक भाजपा अध्येक्ष   बी. एस. येडियुरप्पा यांनी २००८ साली कर्नाटकातील भाजपचे सरकार स्थापन केले, तेव्हा दक्षिण कर्नाटकात ५५ पैकी केवळ ७ जागा भाजपच्या पारड?ात पडल्या होत्या आणि एवढाही आकडा त्यापूर्वी भाजपने साध्य केलेला नव्हता. पाच वषार्नंतर भाजपच्या जागा सातवरून दोनवर आल्या. दक्षिण विभागात भाजपचा आधार आजही वाढलेला नाही. या भागात भाजपने जनता दलाला टार्गेट केलेले नाही. एकप्रकारे जनता दलाला मदत करून काँग्रेसला नुकसान पोहोचवणे हीच भाजपची व्यूहरचना आहे. त्यामुळे कर्नाटकात भाजपचे किंवा भाजप प्रस्तावित सरकार येऊन काँग्रेसला रोखणे हे काम भाजप करणार हे स्पष्ट आहे. 

भाजपशी छुपी हातमिळवणी करून देवेगौडा काँग्रेसला धडा शिकवू पहात आहेत. देवेगौडा यांचा काँग्रेसवर राग असण्याचे कारण म्हणजे, सिद्धरामय्या एकेकाळी त्यांच्या पक्षात होते. जनता दलातून बाहेर पडून, काँग्रेसमध्ये जाऊन ते मुख्यमंत्री झाले. एम. पी. प्रकाश या आणखी एका बड?ा नेत्याला काँग्रेसने जनला दलामधून आपल्याकडे खेचले. याशिवाय १९९६ मध्ये वाजपेयींचे १३ दिवसांचे सरकार पडल्यावर देवेगौडा हे आघाडीचे पंतप्रधान असताना काँग्रेसने अचानकपणे समर्थन काढून घेतल्यामुळे देवेगौडांना पुन्हा घरी जावे लागले होते. स्वत:चे केंद्रातील संयुक्त आघाडी सरकार कोसळल्यावर, खवळलेल्या देवेगौडांनी देशव्यापी दौरा करून, काँग्रेसविरोधी आपण रान पेटवू, अशी गर्जना केली होती. तो सूड उगवायची हीच वेळ आहे हे आता देवेगौडांनी ठरवलेले दिसते.

कर्नाटकात काही वषार्पूर्वी देवेगौडापुत्र कुमारस्वामींनी भाजपशी समझोता केला, याचे

टॅग्स :SolapurसोलापूरKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८