माघी एकादशीसाठी सोलापूर जिल्ह्यातील नऊ डेपोतून धावणार १५८ बस
By Appasaheb.patil | Updated: February 7, 2019 13:24 IST2019-02-07T13:23:25+5:302019-02-07T13:24:58+5:30
सोलापूर : माघ एकादशीनिमित्त पंढरपुरात होणाºया गर्दीचे नियोजन पाहता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूरसह पंढरपूर , बार्शी, अक्कलकोट, करमाळा, ...

माघी एकादशीसाठी सोलापूर जिल्ह्यातील नऊ डेपोतून धावणार १५८ बस
सोलापूर : माघ एकादशीनिमित्त पंढरपुरात होणाºया गर्दीचे नियोजन पाहता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूरसहपंढरपूर, बार्शी, अक्कलकोट, करमाळा, अकलूज, मंगळवेढा, कुर्डूवाडी, सांगोला अशा नऊ डेपोतून १५८ गाड्या धावणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी दिली.
बोलावा विठ्ठल..पाहावा विठ्ठल..क़रावा विठ्ठल...स्वभावे.. या संत वचनाप्रमाणे वारकरी भाविक टाळ-मृदुंगाच्या तालामध्ये विठुरायाचा गजर करत माघ महिन्यातील भागवत शुद्ध एकादशी या माघवारीच्या सोहळ्यासाठी विविध राज्यांमधून चार लाखांहून अधिक वारकरी पंढरपुरात विठ्ठल-रूक्मिणीच्या दर्शनासाठी येतात़ या वारकºयांच्या सेवेसाठी परिवहन विभागाकडून विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत़ भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी विशेष व ज्यादा गाड्यांचे नियोजन करण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले़
उत्पन्न वाढीसाठी विभाग नियंत्रकांचा कानमंत्र
- आषाढी एकादशी वारी, कार्तिकी एकादशी वारी, माघ एकादशी वारी व चैत्र एकादशी वारी या चार महत्त्वाच्या वाºयांचा उत्सव पंढरपुरात होतो़ या उत्सवासाठी राज्यभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात़ या भाविकांची गैरसोय होऊ नये, भाविकांच्या काय अपेक्षा आहेत, भाविकांना महामंडळाकडून काय सहकार्य हवे आहे, खासगी वाहतुकीवर मात करून एसटीचे अधिक उत्पन्न कसे वाढवावे, याबाबत विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी वारीत काम करणारे कर्मचारी, अधिकाºयांना चांगलाच कानमंत्र दिला़
या विभागातून सुटणार गाड्या़
- पंढरपुरात होणाºया माघवारीसाठी सोलापूर विभागातील नऊ डेपोतून गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे़ यात सोलापूर डेपोतून २४, पंढरपूर १३, बार्शी ३४, अक्कलकोट १०, करमाळा १४, अकलूज १५, मंगळवेढा १४, कुर्डूवाडी १३, सांगोला २१ अशा १५८ बसेसची सोय परिवहन महामंडळाकडून करण्यात येणार आहे़ याशिवाय गरज पडल्यास जादा व विशेष गाड्यांचेही नियोजन करण्यात आल्याचे परिवहन विभागाने सांगितले़