सोलापूरात १५ लाख ६२ हजाराचा गुटखा नष्ट, अन्न, औषध विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 15:02 IST2018-09-18T14:59:27+5:302018-09-18T15:02:01+5:30

मागील दोन महिन्यांपासून शहर व जिल्ह्यातील विविध ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने धाडी टाकण्यात आल्या होत्या़

15 lakh 62 thousand rupees of Gutka destroyed, food and medicine department action in Solapur | सोलापूरात १५ लाख ६२ हजाराचा गुटखा नष्ट, अन्न, औषध विभागाची कारवाई

सोलापूरात १५ लाख ६२ हजाराचा गुटखा नष्ट, अन्न, औषध विभागाची कारवाई

ठळक मुद्देशहर व जिल्ह्यातील १४ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्याअवैध गुटखा विक्री करणाºयांवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाकडून सातत्याने कारवाई

सोलापूर : मागील दोन महिन्यांपासून शहर व जिल्ह्यातील विविध ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने धाडी टाकण्यात आल्या होत्या़ या धाडीत जप्त करण्यात आलेला १५ लाख ६२ हजार रूपयांचा गुटखा मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास बोरामणी (ता़ द़ सोलापूर) येथील किर्ती आॅइल कंपनीत नष्ट करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने सहा़ आयुक्त प्रदीप राऊत यांनी दिली़ 

गेल्या दोन महिन्यात शहर व जिल्ह्यातील १४ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या होत्या़ अवैध गुटखा विक्री करणाºयांवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाकडून सातत्याने कारवाई करण्यात येत असल्याने अवैध धंदे वाल्याचे धाबे दणाणले आहेत़ जप्त करण्यात आलेल्या साठ्यात गुटखा, सुगंधी तंबाखू, स्वीट सुपारी, मावा, खर्रा आदींचा समावेश असल्याचेही राऊत यांनी सांगितले़ 

Web Title: 15 lakh 62 thousand rupees of Gutka destroyed, food and medicine department action in Solapur