एसटी बसमध्ये चढताना प्रवाश्याच्या खिशातील १३ हजार रुपये लांबविले
By रूपेश हेळवे | Updated: March 22, 2024 20:05 IST2024-03-22T20:04:55+5:302024-03-22T20:05:26+5:30
याबाबत देडे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

एसटी बसमध्ये चढताना प्रवाश्याच्या खिशातील १३ हजार रुपये लांबविले
सोलापूर: एसटी बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत प्रवाश्याच्या पँटच्या खिशातील १३ हजार ५०० रूपये अज्ञात चोरट्यानेचोरून नेले. ही घटना दि. २० रोजी कुर्डूवाडी बसस्थानकात घडली. याबाबत राघू चंद्रकांत देडे (रा. नाडी ता. माढा) यांनी कुर्डूवाडी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी देडे हे शेतीचे काम पाहाण्याकरीता सून सानिका हिच्या मामाच्या घरी अकलूज येथे गेले होते. अकलूज येथील अरुण व्होरा यांचे शेतात एक वर्षाकरिता काम पाहिले. त्यावेळी अरुण व्होरा यांनी उचल म्हणून १० हजार रुपये दिले व फिर्यादीच्या जवळ ३ हजार ५०० रुपये होते. दि. २० रोजी फिर्यादी हे अकलूजहुन टेंभुर्णी येथे एस टी बसने आले. त्यानंतर कुर्डूवाडी बसस्थानकात ११.५० वाजता जाण्यासाठी गाडी आली असता गाडीमध्ये चढत असताना गर्दीत फिर्यादीच्या उजव्या पँटच्या खिशातील १३ हजार ५०० रुपये अज्ञात चोरट्याने काढून घेतले. याबाबत देडे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.