शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
3
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
4
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
6
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
7
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
8
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
9
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

१ कोटी २८ लाख थकबाकीमुळे सोलापूरातील मोबाईलचे १३ टॉवर सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 1:20 PM

मनपाच्या थकीत करापोटी जीटीएल मोबाईल कंपनीचे १३ मोबाईल टॉवर विशेष वसुली पथकांनी मंगळवारी सील केले. 

ठळक मुद्देथकबाकी वसुलीसाठी नियुक्त केलेल्या पाच पथकांनी शहर विभागात २६ लाख ५४ हजार तर हद्दवाढ भागात १९ लाख ११ हजारांची अशी ४५ लाख ६६ हजारांची वसुली केलीशहरात ४ मिळकती सील केल्या, हद्दवाढ भागात एका मिळकतदाराचे नळ तोडले तर तिघांच्या मिळकती सील केल्याजीटीएल कंपनीचे शहरात ८ तर हद्दवाढ भागात ५ टॉवर आहेत

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २८ : मनपाच्या थकीत करापोटी जीटीएल मोबाईल कंपनीचे १३ मोबाईल टॉवर विशेष वसुली पथकांनी मंगळवारी सील केले. जीटीएल कंपनीचे शहरात ८ तर हद्दवाढ भागात ५ टॉवर आहेत. या टॉवरची एक कोटी २८ लाख ७३ हजार ३४९ इतका कर थकीत आहे. नोटिसा पाठवूनही कंपन्यांच्या अधिकाºयांनी दखल न घेतल्याने मंगळवारी टॉवर सील करण्याची मोहीम घेण्यात आली. यात सिव्हिल लाईन (थकबाकी: १० लाख ४९ हजार), पाच्छापेठ (६ लाख ५० हजार), रामवाडी ए एरिया (७ लाख ४८ हजार), माणिक चौक (९ लाख), सिव्हिल चौक (१३ लाख), पश्चिम मंगळवारपेठ (७ लाख ४६ हजार), होटगीरोड (१३ लाख २३ हजार). यातील शेवटचे तीन टॉवर बंद होते. सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेतीन या काळात ही कारवाई चालली. या मोहिमेत शहर करसंकलन विभाग प्रमुख आर. पी. गायकवाड, एम. आय. बागवान, तेजस्विता कासार, आरती कांगरे, मनोज मंजरतकर, भीमा शिंदे, हद्दवाढ विभागाचे गोपाळ जोशी, बोल्लम, महिंद्रकर यांनी भाग घेतला. विशेष म्हणजे दूरसंचारच्या मोबाईल टॉवरची ८३ लाख थकबाकी आहे. मागील मोहिमेत शहरातील मोबाईल टॉवर सील करण्यात आल्याने मोबाईल सेवा विस्कळीत झाली होती. तरीही अद्याप दूरसंचार खात्याने थकबाकी भरलेली नाही, हे विशेष.थकबाकी वसुलीसाठी नियुक्त केलेल्या पाच पथकांनी शहर विभागात २६ लाख ५४ हजार तर हद्दवाढ भागात १९ लाख ११ हजारांची अशी ४५ लाख ६६ हजारांची वसुली केली. शहरात ४ मिळकती सील केल्या, हद्दवाढ भागात एका मिळकतदाराचे नळ तोडले तर तिघांच्या मिळकती सील केल्या. १ ते २७ फेब्रुवारी अखेर ६ कोटी ५४ लाख १७ हजार ९०९ रुपयांची वसुली झाली तर ७० जणांचे नळ तोडण्यात आले आणि २३ जणांची मिळकत सील करण्यात आली आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूर