शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! सोलापूर महापालिकेत ११२५ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची भरती होणार

By appasaheb.patil | Updated: December 19, 2022 19:25 IST

सोलापूर महापालिकेत ११२५ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. 

सोलापूर: सोलापूर महापालिका स्थापनेनंतर प्रथमच नव्या भरती नियमावलीस राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने अखेर मान्यता दिली आहे. यामुळे आता महापालिकेत ४६१२ मंजूर पदांपैकी १ हजार १२५ कर्मचारी, अधिकाऱ्यांची रिक्त पदभरती आणि पदोन्नतीचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यानुसार आवश्यक असलेली महापालिकेत ‘पदोन्नतीसाठी कर्मचारी निवड समिती’ गठित करण्यात येणार आहे.

शासनाकडे प्रस्तावित असलेल्या ‘सोलापूर महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवा वर्गीकरण) नियम २०२२’ या नियमावलीस नगर विकास विभागाने मान्यता दिली आहे. १५ डिसेंबर २०२२ रोजी तसे आदेश शासनाने काढले आहेत. सोलापूर महापालिकेत नवी भरती करताना महापालिकेचा आस्थापना खर्च महत्त्वाचा ठरणार आहे. शासन नियमानुसार नव्या भरतीसाठी सोलापूर महापालिकेला ३५ टक्क्यांपर्यंत आस्थापना खर्च मर्यादेची अट आहे. सध्या सोलापूर महापालिकेचा आस्थापना खर्च हा ४१ टक्के आहे. दरम्यान, तब्बल २५ टक्के रिक्त असलेली ही पदे भरतीसाठी शासनाच्या नव्या भरती नियमावलीच्या मान्यतेची प्रतीक्षा होती. शासनाकडे महापालिकेने पाठविलेला हा प्रस्ताव प्रलंबित होता. अखेर १५ डिसेंबर रोजी शासनाने नव्या भरती नियमावलीस मान्यता दिली आहे. यासाठी यापूर्वीचे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. यामुळे हा प्रलंबित भरतीचा व पदोन्नतीचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे.

पदोन्नतीसाठी कर्मचारी निवड समितीची रचना अशीभरती नियमावलीच्या मान्यतेनंतर आता सोलापूर महापालिकेत पदोन्नतीसाठी कर्मचारी निवड समिती गठित करणे आवश्यक आहे. त्याची रचना याप्रमाणे - अध्यक्ष - महापालिका आयुक्त किंवा पदनिर्देशित अन्य अधिकारी, सदस्य - मुख्य लेखा परीक्षक, संबंधित विभागाचे प्रमुख, आयुक्तांनी नामनिर्देशित केलेला मागासवर्गीय प्रवर्गातील अधिकारी, निमंत्रक तथा सदस्य सचिव - उपायुक्त (सामान्य प्रशासन), अशी एकूण पाच जणांची ही निवड समिती राहणार आहे.

अशी आहे महापालिकेत वर्गनिहाय रिक्त पदांची संख्याअ वर्गात ११२ पदे मंजूर असून, त्यापैकी ३५ पदे भरली आहेत, तर ७७ पदे रिक्त आहेत. ब वर्गातील २६३ पदे मंजूर असून, ८६ पदे भरण्यात आली. यामध्ये १७७ रिक्त पदांची संख्या आहे. क वर्गात १ हजार ३४२ पदे मंजूर आहेत, त्यापैकी ८०० पदे भरली असून, ५४७ पदे ही रिक्त आहेत. ड वर्गात २ हजार ८९५ पदे मंजूर करण्यात आली असून, २ हजार ५३० पदे भरली आहेत. ३१० पदे रिक्त आहेत, असे असे एकूण अ, ब, क, ड या चारही वर्गांतील १ हजार १२५ पदे रिक्त आहेत.

  

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाjobनोकरी