गोपनीय अहवालासाठी शिक्षक समितीकडून ११०० फाईल्स शिक्षणाधिकाऱ्यांकडे सुपूर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:23 AM2021-03-17T04:23:09+5:302021-03-17T04:23:09+5:30

शिक्षक कर्मचारी यांच्या वार्षिक कामाचे वार्षिक कार्यविवरण आणि कार्यमूल्यमापन अहवाल म्हणजेच गोपनीय अहवाल होय. वर्षभरात केलेल्या उल्लेखनीय कामाची नोंद ...

1100 files handed over to the education officer by the teachers committee for confidential report | गोपनीय अहवालासाठी शिक्षक समितीकडून ११०० फाईल्स शिक्षणाधिकाऱ्यांकडे सुपूर्द

गोपनीय अहवालासाठी शिक्षक समितीकडून ११०० फाईल्स शिक्षणाधिकाऱ्यांकडे सुपूर्द

Next

शिक्षक कर्मचारी यांच्या वार्षिक कामाचे वार्षिक कार्यविवरण आणि कार्यमूल्यमापन अहवाल म्हणजेच गोपनीय अहवाल होय. वर्षभरात केलेल्या उल्लेखनीय कामाची नोंद या अहवालात करण्यात येते. तालुक्यातील बऱ्याच शिक्षकांच्या गोपनीय अहवालास फाईल्स उपलब्ध नसणे,फाईल्स सुस्थितीत नसल्याने अनेक शिक्षकांचे गोपनीय अहवाल जीर्ण तसेच फाटलेल्या स्थितीत होते. याची दखल घेत शिक्षक समितीच्या वतीने उत्तम दर्जाच्या फाईल्स उपलब्ध करून देण्यात आल्या.

यावेळी शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी संघटनेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी गोपनीय अहवाल विभागप्रमुख बाळासाहेब जेऊरगी यांनी संघटनेचे आभार व्यक्त केले.

यावेळी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अनिल कादे, पुणे विभागीय अध्यक्ष दयानंद कवडे, तालुकाध्यक्ष सिद्धाराम बिराजदार, कन्नड विभाग जिल्हाध्यक्ष बसवराज गुरव, सरचिटणीस होन्नप्पा बुळळा, शिक्षक नेते राजशेखर उंबराणीकर, शंकर आजगोंडे, विजयकुमार कोळी, शंकरलिंग माशाळे,संगण्णा फताटे, प्रकाश कोळी,अमोल बोराळे आणि दयानंद चव्हाण,शरणप्पा फुलारी उपस्थित होते.

----१६अक्कलकोट-टीचर

फोटोओळ : अक्कलकोट तालुक्यातील गोपनीय अहवालासाठीच्या फाईल्स शिक्षणाधिकारी राठोड यांच्या कडे सुपूर्द करताना जिल्हाध्यक्ष कादे, सिद्धाराम बिराजदार, बसवराज गुरव आदी.

Web Title: 1100 files handed over to the education officer by the teachers committee for confidential report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.