सोलापूर मनपाच्या प्रभाग २० मध्ये ११ हजार मतदार वाढले; अंतिम यादी उद्या जाहीर होणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 21:43 IST2022-07-15T21:41:50+5:302022-07-15T21:43:24+5:30
Solapur Municipal Corporation : मतदान केंद्र अधिकारी, मनपा कर्मचाऱ्यांनी प्रभागात जाऊन पडताळणी करावी असे आदेश आयुक्तांनी दिले होते.

सोलापूर मनपाच्या प्रभाग २० मध्ये ११ हजार मतदार वाढले; अंतिम यादी उद्या जाहीर होणार!
- राकेश कदम
सोलापूर : महापालिकेची प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी शनिवारी ११ वाजता जाहीर होणार, असल्याचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी शुक्रवारी सांगितले. प्रभाग २० मध्ये नव्याने सर्वाधिक ११ हजार मतदार समाविष्ट होतील.
महापालिकेच्या प्रारुप मतदार यादीवर ४०० हून अधिक हरकती दाखल झाल्या होत्या. मतदारांचा रहिवास एका भागात तर मतदार यादीतील नाव दुसऱ्याच प्रभागात अशा अनेक तक्रारी होत्या. मतदान केंद्र अधिकारी, मनपा कर्मचाऱ्यांनी प्रभागात जाऊन पडताळणी करावी असे आदेश आयुक्तांनी दिले होते.
सर्वच हरकतींची पडताळणी पूर्ण झाली आहे. प्रभाग १३ व २० च्या मतदार यादीत बदल झाले आहेत. प्रभाग २० मध्ये पूर्वी १७ हजार मतदार होते. आता २८ हजार मतदार असतील. प्रभाग १३ मध्ये १७ हजार मतदार होते. आता १९ हजार ७२२ मतदार असतील. इतर प्रभागात दुरुस्ती झाल्याचे आयुक्तांनी सांगितले. ही अंतिम यादी शनिवारी जाहीर होणार आहे.